Malegaon News Saam tv
महाराष्ट्र

Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर शहरात शांतता; पोलीसांकडून बंदोबस्त तैनात, दुकाने बंद

Malegaon News : मालेगाव बॉम्ब स्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. मात्र निकालानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सातही आरोपींची १७ वर्षांनंतर कोर्टाने निर्दोष सुटका केली

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

नाशिक (मालेगाव) : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तब्बल १७ वर्षानंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून काल निकाल जाहीर करण्यात आला. बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या निकालानंतर मालेगाव शहरात सर्वत्र शांतता असून सुरक्षा म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मालेगावमधील भिक्खू चौकात २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानंतर प्रकरणाचा निकाल ३१ जुलैला देण्यात आला असून यात आरोपी असलेल्या सर्व सात जणांची निर्दोष सुटका करण्यात आला आहे. यानंतर शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मध्यवर्ती भागांमध्ये बंदोबस्त 

तब्बल १७ वर्षांनी काल मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला. या निकालानंतर मालेगावकरांनी आपली शांततेची परंपरा व जातीय सलोखा अबाधित ठेवत दैनंदिन जीवनाला सुरुवात केली. मात्र, बाँबस्फोट निकालाच्या नंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस यंत्रणा सतर्क असून शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यास आता सुरुवात केली आहे. शिवाय काही ठिकाणी दुकाने देखील बंद ठेवण्यात आली आहे. 

दोन अतिरिक्त तुकड्या वाढविल्या 

कालचा ठेवलेला बंदोबस्त व्यतिरिक्त आज दोन अतिरिक्त तुकड्या मागवून त्या अलर्ट ठेवण्यात आल्या आहे. दरम्यान, नाशिकचे ग्रामीण पोलीस जिल्हा अधीक्षक यांनी मालेगावकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे देखील नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime : ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेची निर्घृण हत्या, मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला अन्...

Sindhudurg Shocking : सिंधुदुर्गात समुद्रात ८ पर्यटक बुडाले, तिघांचा मृत्यू, मदतकार्य सुरु

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? पोलीस ठाण्याच्या हद्दीतच भरदिवसा हवेत गोळीबार|Video Viral

Maharashtra Live News Update: सोलापूरच्या चिंचोली MIDC मध्ये कंपनीत आग

Saturday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होणार, कामात बढतीचे योग; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT