Beed : महादेव मुंडे प्रकरणात ४ जणांना बेड्या, बडा मासा गळाला लागल्याची शक्यता

Beed News : महादेव मुंडे हत्या प्रकरणी चार ते पाच तपास अधिकारी बदलविण्यात आले. दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला यानंतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

योगेश काशीद 

बीड : महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एक बडा मासा गळाला लागल्याची शक्यता असून हत्या प्रकरणी चार जणांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी बीड पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. यामुळे मुंडे हत्या प्रकरणाला आता गती मिळाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

बीडच्या परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ ला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आले आहे. तरी देखील मुख्य आरोपी अद्याप अटकेत नाही. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून चौकशी सुरु असून आता या प्रकरणातबडा मासा गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Beed News
Ajit Pawar : चौफुल्याला जाऊन तडफडू नका, बदनामी होते, अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना दम; पाहा VIDEO

त्यांची माहिती गोपनीय 

महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चौकशी सुरू असून संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक रात्रीच रवाना झाले होते. चौकशी सुरू असलेला लोकांची ओळख पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप पर्यंत देण्यात येत नाही.

Beed News
Shahapur : रिल बनवत रस्त्यावरील खड्यात केली आंघोळ; शहापूर- सापगाव रस्ता दुरुस्तीची मागणी

पाच संशयित सध्या ताब्यात 
महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर सुरुवातीचा तपास परळी पोलीस स्टेशनचे पीआय रवि सानप यांच्याकडे होता. सानप आरोपीला अटक करण्यासाठी गेले असता त्यांची लगेच बदली झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर तीन जणांकडून तपास काढून घेण्यात आले. सध्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास आहे आणि शिवाजी बंटेवाड हे प्रमुख आहेत. संशयित आरोपी गोट्या गित्ते याला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.  एकूण पाच संशयतांना सध्या ताब्यात घेतल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. एक गोपनीय महत्त्वाचा साक्षीदार आहे ज्याच्याकडे सविस्तर तपास करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com