Ambajogai Bus Accident Saam TV
महाराष्ट्र

Ambajogai Bus Accident: बुट्टेनाथ घाटात एसटी बसचा भीषण अपघात; २० ते २५ प्रवासी जखमी, काहींची प्रकृती चिंताजनक

Bus Accident News: अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या, बुट्टेनाथ घाटात, एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

विनोद जिरे

Ambajogai Bus Accident:बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या, बुट्टेनाथ घाटात, एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. घाटातील अरुंद रस्त्यामुळे चालकाचे अचानक बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट खोल खड्ड्यात कोसळली.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बस उलटल्याने २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सदरील बस अंबाजोगाई (Ambajogai) येथून मोरफळी दिशेने जात होती. बुट्टेनाथ घाटात, आल्यानंतर अरुंद रस्त्याचा अंदाज चालकाला आला नाही. काही कळण्याच्या आतच चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस (Bus Accident) थेट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली.

मागील काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला होता. यामध्ये लहान मुलाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर रस्त्याच्या रूंदीकारणासाठी मागणी करण्यात आली होती. (Breaking Marathi News)

या मागणीनंतर घाटातील रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम संबंधित गुत्तेदाराकडून अगदी संत गतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. त्यामुळं बसचा अपघात झाल्याचं बोललं जातंय.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार गणेश सरोदे, अधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्यासह तहसील ,पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरू केले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

SCROLL FOR NEXT