NCP Resignation  Saam tv
महाराष्ट्र

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; बड्या नेत्याने तडकाफडकी साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?

Pratap Deshmukh, Parbhani Politics : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे परभणी जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिल्याने मराठवाड्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Namdeo Kumbhar

Pratap Deshmukh resigns from NCP latest news : राज्यातील एकीकडे पावसाने हाहाकार माजवला असतानाच दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. परभणीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि अजित पवारांचे खंदे समर्थक प्रताप देशमुख यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सूत्रांने दिलेल्या वृत्तानुसार, देशमुख हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

राजीनाम्यामागचे मुख्य कारण काय?

प्रताप देशमुख हे अजित पवार गटाचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात. राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीचे पहिले महापौर होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. त्यांनी राजीनाम्यासाठी वैयक्तिक कारण पुढे केले असले, तरी यामागे स्थानिक राजकीय समीकरणे कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत परभणीमधील संख्याबळ जास्त असूनही राष्ट्रवादीने या जागेवरील आपला दावा सोडला होता. यामुळे परभणीतील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यातच पक्षाच्या आदेशामुळे त्यांना नाईलाजाने शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करावे लागले होते. याच नाराजीतून देशमुख यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदेंची मराठवाड्यात मोर्चेबांधणी

ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा मित्रपक्षांतील नाराज नेत्यांकडे वळवला आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी शिंदेंकडून पावले उचलली जात आहेत. आधीच ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या ६ खासदारांपैकी दोन खासदार मराठवाड्यातील आहेत, आणि आता परभणीतील राष्ट्रवादीचा नेताही गळाला लागलाय. प्रताप देशमुख यांच्यासारखा मोठा चेहरा पक्षात आल्यास शिंदेंची ताकद आणखी वाढणार आहे.

दिलीप वळसे पाटलांकडे अर्थमंत्रिपद?

मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थमंत्रिपदासाठी जोरदार आग्रह धरल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांनंतर हे महत्त्वाचे खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चालू पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर हे अर्थखाते राष्ट्रवादीला दिले जाऊ शकते आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या गळ्यात या मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. मात्र, वळसे पाटील यांनी या चर्चांवर बोलताना, "मला या विषयाची कोणतीही कल्पना नाही," असे म्हणत सध्यातरी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई - पुणे ST बस सेवा पूर्णपणे बंद; ५० फेऱ्या रद्द

Maharashtra News Live Update: आळंदी आणि देहू मध्ये न जाता पुण्यातून पालखीमध्ये सहभागी व्हा, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन

Monsoon Skin Care : महागड्या क्रीमची गरज नाही, पावसाळ्यात 'या' फेसपॅकने गायब होतील चेहऱ्यावरील काळे डाग

Cricketer dies: धक्कादायक! फलंदाजी करताना अचानक कोसळला आणि...! लाईव्ह सामन्यात क्रिकेटपटूचा मृत्यू

Mumbai Rain: पुढचे ३ तास महत्वाचे, मुंबई- पुण्याला रेड अलर्ट; राज्य सरकारची तयारी काय, मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लान

SCROLL FOR NEXT