Kankavli Nagarpanchayat Election Saam Tv
महाराष्ट्र

Konkan Politics: कोकणात भाजपला हादरा, कणकवलीच्या नगराध्यपदी पारकर

Kankavli Nagarpanchayat: कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले आहे.

Priya More

सिंधुदुर्गच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कणकवली नगरपंचायतीवर शहर विकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले आहे. हा नितेश राणे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे ९ उमेदवार विजयी झाले. तर शहर विकास आघाडीचे ८ उमेदवार विजयी झाले. शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे नगराध्यक्ष झाले. गेली १० वर्षे नितेश राणेंची कणकवली नगरपंचायतीवर वर्चस्व होते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नितेश राणे यांच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

कणकवली नगरपंचायत निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेने कणकवलीत शहरविकास आघाडीला पाठींबा दिला होता. निलेश राणे यांनी शहर विकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे राणे बंधू आमने-सामने आले होते. निलेश राणेंनी शहरविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासाठी दोनदा सभा घेतल्या होत्या. कणकवलीकरांनी शहरविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला असल्यामुळे मोठे बंधू निलेश राणे मंत्री नितेश राणेंवर भारी पडल्याचे बघायला मिळत आहे.

निलेश राणे यांनी कोकणातील विजयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'मालवणमध्ये मिळालेले यश हा जनतेचा आशीर्वाद आहे. शिवसैनिकांनी स्वतःच्या हातात ही निवडणूक घेतली. एका व्यक्तीची ही निवडणूक नाही. भाजपचा झालेला पराभव आम्हाला आनंद देणारा नाही तर दुख देणारा आहे. भाजपचा जिथे पराभव झाला तिथे आनंद साजरा करणार नाही. भाजप हा आमचाच परिवार आहे. आम्ही महायूती म्हणून निवडणूक लढविण्यासाठी आग्रही होतो. जिल्हा परिषदांसाठी ही आग्रही राहणार आहोत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Hair Home Remedies: केस खूप पांढरे झालेत? शाईनपण गेली? मग वापरा 'हे' खास हेल्दी तेल

Maharashtra Live News Update : नागपुरात बालाघाट मेमू गाडी रुळावरून घसरली, मोठा अपघात टळला

इराण अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार? युद्धावरून मुस्लिम देशांत खलबतं

Chanakya Niti: आयुष्यात या ४ प्रकारचे मित्र कधीच देत नाही दगा, चाणक्यांनी सांगितलं गुपित

Iran–Israel–US conflict: एक महिन्यानंतरही युद्ध सुरूच; आखाती युद्धामुळे जगाची इंधनकोंडी

SCROLL FOR NEXT