संजय राठोड, यवतमाळ प्रतिनिधी
Maharashtra Local Body Election News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Maharashtra local elections) आधी अजित पवार (Maharashtra politics news) यांच्या राष्ट्रवादीला इंद्रनील नाईक यांच्या पुसदमध्ये मोठा धक्का बसला आहे. यवतमाळमधील पुसद शरातील तब्बल ४३ पदाधिकार्यांनी एकाचवेळी राजनीमे (Pusad political crisis) दिले आहे. उपजिल्हाध्यक्षासह अनेक पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. मानसन्मान मिळत नसल्याने सर्वांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा दिलाय. इंद्रनील नाईक राज्यमंत्री झाल्यापासून मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना मोठा झटका मानला जातोय. पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. (Why NCP office bearers quit in Yavatmal Pusad)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यासोबतच पक्षाच्या अल्पसंख्यांक शहराध्यक्षांनी देखील राजीनामा दिला.या दोन्ही नेत्यांचे कट्टर समर्थक असलेल्या ४३ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्षाकडे राजीनामा दिला. यामुळे पुसद शहरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना मोठा झटका बसल्याचं मानले जात आहे. (Indranil Naik controversy Pusad political crisis)
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष पठाण अहमद खान नजीर खान यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाकडे तर अल्पसंख्यांक शहराध्यक्ष चांद खा यांनी राजीनामा दिला आहे. त्या दोघांच्या 43 कट्टर समर्थकांनी पक्षाच्या शहराध्यक्ष मोहम्मद इरफान,मोहम्मद फय्याज यांच्याकडे राजीनामा दिलाय. मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पुसद शहरात मोठा फटका बसलाय.
राज्यमंत्र्यांचा पदभार इंद्रनील नाईक यांना मिळाल्यामुळे त्यांचा कामाचा व्याप वाढलेला आहे. ते प्रत्येक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालत असतात, सर्वांच्या समस्या सोडवतात हे सर्वांचे नेते आहेत. किरकोळ कारणासाठी राज्यमंत्री त्यांच्यासोबत फिरणार नाहीत. वेळेअभावी त्यांना फोनवर बोलणे शक्य नाही, त्यांच्याबद्दल अपप्रचार सुरू आहे, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्षांनी दिली आहे. राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.