समृद्धी महामार्गावर ट्रक-टेम्पोचा भीषण अपघात झाला.
अपघातामध्ये पिकअपमधील २ जणांचा जागीच मृत्यू झाला.
ट्रकमधील २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
वाशिम पोलिसांकडून अपघाताचा तपास आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वाशिममधील समृद्धी महामार्गावर ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा तपास वाशिम पोलिस करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या कारंजाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली. संभाजीनगरवरून नागपूरकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने पिकअपला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप वाहतील २ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळ चॅनल क्रमांक २१३ वर झाला आहे. पीकअप टमाटे घेऊन नागपूरकडे जात होता. तर आयशर ट्रक हा छत्तीसगडला जात होता. ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने त्याने पिकअपला धडक दिली. भरधाव ट्रकने पिकअपला इतक्या जोरात धडक दिली की त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दोन्ही वाहनं समृद्धी महामार्गावरून बाजूला काढण्यात आले आहेत. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.