Maharashtra Police Officer Transfer:  saam Tv
महाराष्ट्र

Police Officer Transfer: मोठी बातमी! ६ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडक्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Police Officer Transfer: बीडच्या विलास घुले हत्याकांड प्रकरणात पोलिस अधिक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांनी ६ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदली केल्या.

Priya More
  • बीडमधील ६ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

  • विलास घुले हत्याकांडानंतर पोलिसांच्या बदल्या

  • बीड एसपी नवनीत काँवत बदली आदेश

  • बीड पोलीस प्रशासनातील मोठे फेरबदल

योगेश काशिद, बीड

बीडचे हॉटेल व्यवसायिक विलास घुले हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील ६ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. विलास घुले हत्या प्रकरणानंतर आरोप होत असलेल्या स्वप्निल उनवणे यांच्या विनंतीवरून या बदल्या करण्यात आल्या आहेत. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

पोलिस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांची माजलगाव शहरात बदली करण्यात आली. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची केज पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. विलास घुले हत्या प्रकरणानंतर आरोप झालेले पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या 'विनंतीवरून' बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली.

तर अनेक आरोप असलेले पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांची सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक नीलेश केळे यांची सायबरवरून पेठ बीड आणि पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ यांची आर्थिक गुन्हे शाखेतून प्रभारी पोलिस उपअधीक्षक मुख्यालय बीड येथे बदली करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी- भरत गोगावले

Ranjangaon : साडेतीन महिन्यांनंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी खुले; दर्शनासाठी मोठी गर्दी

लाडक्या लेकीसाठी बनवा सोन्याची चैन, या 5 डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये

Anti Paper Leak Law: सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; पेपरफुटीप्रकरणी दोषींना ३ महिन्यांच्या आत होणार शिक्षा

अभिजीत दिपकेंची प्रकृती बिघडली; भेटीगाठी घेत असतानाच घाईघाईनं घरात गेले, तातडीने डॉक्टर पोहोचले

SCROLL FOR NEXT