Uddhav Thackeray News Saam tv
महाराष्ट्र

पुण्यात मोठा राजकीय भूकंप! भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, बड्या नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Multiple Leaders Quit BJP-NCP, Enter Uddhav Thackeray’s Camp: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का. पुण्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

Bhagyashree Kamble

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. काही प्रभागातील निवडणुका २० डिसेंबर रोजी होणार आहेत. दरम्यान, आता नेत्यांचे लक्ष नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांकडे वळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षफोडीच्या राजकारणही जोर धरू लागले आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांनीही शिवबंधन हाती बांधलं आहे.

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले, भारतीय जनता पार्टी माथाडी पुणे शहराध्यक्ष अक्षय भोसले आणि मातंग एकता आंदोलनाच्या आरती मिसाळ यांनी हाती शिवबंधन बांधलं.

तसेच क्रांतीवीर झोपडपट्टी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश परदेशी आणि छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांच्या हाती शिवबंधंन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये काँग्रेसला धक्का, माजी नगरसेवक मनोज साबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

अखेर काँग्रेस-वंचितच्या आघाडीची घोषणा, काँग्रेसच्या हाताला वंचितची साथ

योगी-मोदींशी वैर नाही, पण...; जैन मुनी नीलेश चंद्रांचा भाजपवर हल्लाबोल|VIDEO

Kale Khajoor Benefits: रोज सकाळी २ काळे खजूर खाण्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; तिकीट कापल्याने अनेक नेत्यांची अजित पवार गटात एन्ट्री

SCROLL FOR NEXT