योगेश काशीद, साम टीव्ही
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल असून नेतृत्वावरून बीड जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठा संघर्ष उभा राहिला आहे. अशातच आता बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी वेगळी चूल मांडले असून घड्याळाच्या चिन्हावर न लढण्याऐवजी जनता आघाडी करून ते निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचबरोबर राष्ट्रवादीचे दुसरे नेते अमरसिंह पंडित हे राष्ट्रवादीकडून दुसरा पॅनल उभा करत घड्याळाचा चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नेतृत्वमुळे मोठा धक्का बसला असून योगेश क्षीरसागर यांनी वेगळीच चूल मांडली आहे. तर अमरसिंह पंडित हे घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढत असून जिल्ह्यामध्ये बीड नगरपरिषदेमध्ये दोन राष्ट्रवादी, एमआयएम आणि योगेश क्षीरसागर यांच्या आघाडीमुळे आता बीड जिल्ह्यामध्ये चौरंगी लढत होणार आहे.
नेतृत्वाला आव्हान देणाऱ्यांना उमेदवारी न देण्याची भूमिका घेत, ५२ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष सर्व ५३ उमेदवार आम्हीच ठरवू, अशी आक्रमक सुरुवात करणारे डॉ. योगेश क्षीरसागर आता जास्तीत जास्त आठ उमेदवारांचीच मागणी या भूमिकेपर्यंत मागे सरकले आहेत. त्यामुळेच त्यांचा कल भाजपकडे झुकत असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर NCPने डॉ. क्षीरसागरांना समीकरणातून दूर ठेवत ५२ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्रपणे तयारी सुरू केली आहे.
नगराध्यक्ष पद रिपाइंला देत शिवसेना आणि शिवसंग्रामला सोबत घेण्याची रणनीती राष्ट्रवादीच्या गोटात आकार घेत आहे. दरम्यान, डॉ. क्षीरसागरांनीही नोंदणीकृत जनता विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र मोहीम सुरू केली आहे. भाजपसोबत त्यांची चर्चाही सुरू असून भाजपचे चिन्ह किंवा आघाडी अशी दुहेरी रणनीती ते राबवत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.