bhandara news  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ईव्हीएम मशीनमध्ये घोळ; निवडणूक निकालानंतर ७ कर्मचाऱ्यांचं निलंबन

bhandara politics : ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचे सिद्ध झालं. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी ७ कर्मचाऱ्यांचे निलंबन केलं.

Vishal Gangurde

निवडणुकीची मतमोजणी करताना केंद्रावर घोळ

केंद्रावर घोळ झाल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

आरोपानंतर भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडून ७ कर्मचाऱ्यांवर कारवाई

शुभम देशमुख, साम टीव्ही

राज्यभरात रविवारी नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीची निकाल जाहीर झाले. या निवडणुकीच्या मतदानाची मोजणी कालच पार पडली. निवडणुकीची मतमोजणी करताना केंद्रावर घोळ झाल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. त्यानंतर आज सोमवारी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी ७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईची केली आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावरील एका ईव्हीएम मशीनमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप रविवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला. भंडाऱ्यातील प्रभाग क्रमांक 3 मधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार करुणा राऊत यांचं एका ईव्हीएम मशीनमध्ये नाव नसल्याची तक्रार पक्षाच्या उमेदवाराने काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती.

तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना चूक लक्षात आली. त्यांनी या प्रकरणात अक्षम्य चूक झाल्याचं मान्य केले. त्यानंतर भंडारा जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी मतमोजणी केंद्रावरील सात कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. या कारवाईन भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे काय?

1) मोहम्मद इसरार, उपविभागीय अधिकारी टेकेपार, उपसा सिंचन उपविभाग क्र. १ आंबाडी

2) ए.एन. मळघने, तलाठी चांदोरी.

3) पियुष शक्करवार, लिपिक टंकलेखक, नगर परिषद भंडारा

4) के.एच. लांजेवार, शिक्षक जे. एम. पटेल. कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भंडारा (केंद्राध्यक्ष)

5) जी. एस. नागदेवे, शिक्षक विकास माध्यामिक शाळा आणि जुनिअर कॉलेज खरबी नाका (मतदान अधिकारी क्र. १)

6) महेश हेमराज दुर्गाडे, सी.ई.ए. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना एम. आर. आर.डी.ए. भंडारा (मतदान अधिकारी क्र. २)

7) लीनादेवी चीचमलकर, शिक्षक नूतन कन्या शाळा आणि जे. आर. कॉलेज भंडारा (मतदान अधिकारी क्र.३)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCPच्या नेत्यावर दिवसाढवळ्या गोळीबार; अज्ञात हल्लेखोरांचा बांगलादेशात कहर

Tuesday Horoscope: जवळचा व्यक्तीच देईल धोका, ५ राशींचा पैसा जाणार वाया; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: डोंबिवली येथील लक्ष्मी सागर इमारतीच्या टेरेसच्या भिंतीचा भाग कोसळला

Migraine Pain: मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी 'या' सवयींचे पालन करणं अत्यंत महत्वाचं

Diabetes Bad Habits: डायबेटिसचा त्रास आहे? ही १ वाईट सवय झटक्यात वाढवते ब्लड शूगर लेव्हल, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT