Election Update EVM news Saam tv
महाराष्ट्र

Election Update: निवडणुकीत मोठा बदल? EVMला ब्रेक, बॅलेट पेपर पुन्हा येणार?

Election Update: EVM हॅक होत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात असतानाच आता निवडणुकी आयोगानं मोठा निर्णय घेतलाय. यापुढे मतदान प्रक्रिया कशी राबवली जाणार? निवडणुक आयोग नेमका कोणता पॅटर्न राबवणार आहे?

Suprim Maskar

Election Update: ईव्हीएम हॅक होतं की नाही? हा वाद प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. धुळे सोलापूर मार्गावर EVM च्या विरोधात रस्त्यावर उतरून जाळपोळ करण्यात आली. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम वर बंदी घालण्याची मागणी करत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काहीजण घुसले होते. एकूणच ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच शेजारील राज्यात EVM ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कर्नाटकात EVM च्या या वादावर फुलस्टॉप लावण्यात आलाय.मुंबई महापालिकेपेक्षा मोठ्या असणाऱ्या बंगळुरु महापालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2025 मध्ये स्थानिक निवडणुकांसाठी मतपत्रिका वापरण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला केली होती. सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यांनतर अखेर EVM ला आऊट करून मतपत्रिकेला इन करण्यात आलयं.

कर्नाटकचे राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संगरे यांनी स्वत: यासंदर्भात घोषणा केलीय.. त्यामुळे 25 मे नंतर बंगळुरु प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या 5 नगरपरिषदांच्या निवडणुका या मतपत्रिकांद्वारे घेण्यात येणार आहेत.

त्यामुळे लोकशाहीच्या उत्सवात राजकीय पक्षांच्या मताला किंमत देत. निवडणुक आयोगानं घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. आता मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांची पारदर्शीपणे अंमलबजावणी होणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT