Yavatmal crime  Saam
महाराष्ट्र

Yavatmal News : महाराष्ट्र पोलिसांचा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नेटवर्कला मोठा झटका; यवतमाळमध्ये केली जोरदार कारवाई, वाचा

lawrence bishnoi Latest news : पोलिसांनी बिश्नोई गँगच्या नेटवर्कला मोठा झटका दिला आहे. यवतमाळमध्ये पोलिसांनी गँगमधील एकाला अटक केली आहे.

Saam Tv

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या एका गुन्हेगाराला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ शहरातील जाम रोड भागात लपून राहत होता. ३५ वर्षीय भुपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा याला यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अटक केली. त्याच्यावर राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यात २०२३ साली घडलेल्या खुनाच्या प्रकरणात गुन्हा दाखल होता. हत्येच्या गुन्ह्यानंतर तो फरार झाला होता.

यवतमाळ पोलिसांना गुप्त खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती की, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा एक सक्रिय सदस्य शहरात वास्तव्यास आहे. त्या माहितीनंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संसशियाच्या हालचालींवर लक्ष ठेवले. पुरावा आणि खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. भुपेंद्र सिंगवर राजस्थान पोलिसांनी २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तो अत्यंत हुशार आणि सावध गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक होऊ नये म्हणून तो सातत्याने राहण्याची ठिकाणे बदलत होता. तो बनावट नावाने घर भाड्याने घेत होता. यवतमाळच्या जाम परिसरात त्याने ओळख लपवून रूम भाड्याने करून राहत होता.

विदेशातून मिळत होते डॉलर्समध्ये पैसे

आरोपीला विदेशातून तीन वर्षांपासून आर्थिक मदत मिळत होती. गॅंग स्टार बिल्लू गुजर याचा भाऊ सौरभ गुज्जर हा सध्या परदेशात आहे. त्याच्या मार्फत भुपेंद्र सिंगला डॉलर्समध्ये पैसे ट्रान्सफर केले जात होते. या पैशांच्या मदतीने तो आपली उपजीविका करून सक्रिय होता.

यवतमाळ पोलिसांचं कौतुक

यवतमाळ पोलिसांच्या या कौशल्यपूर्ण आणि ठोस कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या सावटाच्या पार्श्वभूमीवर ही अटक महत्वाची मानली जात आहे. यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या महाराष्ट्रातील नेटवर्कला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

SCROLL FOR NEXT