राज्यात राजकीय वातावरण तापलं
समाजवादी पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर
आमदाराचं पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनाच थेट पत्र
महाराष्ट्रात २९ महापालिकांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रातील समाजवादी पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्या विरोधात पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनाच थेट पत्र लिहिलं आहे.
आमदार रईस शेख यांनी पत्रात म्हटलं आहे की, 'प्रदेशाध्यक्ष अबू आझमी हे मला हेतूपूर्वक त्रास देत आहेत. याचा परिणाम थेट भिवंडी महापालिका आणि मुंबई महापालिकेवर होत आहेत'.'अबू आझमी यांनी मुंबई महापालिका आणि भिवंडी महापालिकेच्या तिकीट वाटपात मनमानी कारभार केला. मला कोणीच रोखू शकत नाही, असं आझमी जाहीर सभेतही सांगू लागले आहेत. आझमी यांनी स्पष्टीकरण द्यावे, असं रईस यांनी पत्रात म्हटलं आहे.
आमदार रईस शेख यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना लिहिलेल्या पत्रात अबू आझमी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार रईस शेख यांनी तिकीट वाटपावरूनही गंभीर आरोप केले. मिळालेल्या पदाचा गैरवापर, प्रायव्हेट लिमिटेड संस्कृती, पंख कापण्याचं षटयंत्र, असे कारनामे त्यांनी सुरू केल्याचा आरोप रईस यांनी केला.
आमदार रईस शेख यांनी २००७ साली समाजवादी पक्षात प्रवेश केला. ते २०१२ आणि २०१७ साली मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी पालिकेत स्थायी समिती सदस्य पद देखील भूषवलं आहे. पुढे २०१९ आणि २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले.
२०२४ साली झालेल्या निवडणुकीत रईस शेख यांनी १ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. मात्र, यंदा भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.