Maharashtra Vidhan Sabha Election results 2019 : नंदूरबारमध्ये महायुतीला भरघोस यश मिळालेय. येथील तीन जागांवर महायुतीला विजय मिळालाय. एका जागेवर काँग्रेसचा उेमदवार जिंकलाय. अक्कलकुवा हा काँग्रेसचा गड ढासळला आहे. नंदुरबारमध्ये फक्त नवापूरमध्येच काँग्रेसला विजय मिळवता आलाय.
नंदुरबार जिल्ह्यातल्या चारही जांगाचे कौलस्पष्ट झाले असून राज्यातल्या क्रमांक 1 च्या मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवामधून तब्बल सात वेळा आमदार राहीलेल्या के.सी पाडवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहेत. याठिकाणी विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांचा विजय झाला आहे. त्यामुळे गेल्यावेळी अतिशय कमी फरकाने यशाला हुलकावणी दिलेल्या आमश्या पाडवी यांचे जनसामान्यातून विधानसभेत जाण्याचे स्पप्नपुर्ण झाले आहे. याठिकाणी अपक्ष बंडखोर डॉ हिना गावित या तिसऱ्या क्रमांकावर राहील्या आहेत. सुरवातीला मतमोजणी मध्ये त्यांच्यात आणि कॉग्रेसमध्ये चुरस दिसून आली मात्र मतमोजणीच्या फेऱ्यामध्ये आमश्या पाडवी यांनी घेतलेली आघाडी त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करणारी ठरली . आता विधानसभेतील विजयानंतर आमश्या पाडवी यांना विधान परिषदेचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
अक्कलकुवा मतदारसंघ
आमश्या फुलजी पाडवी – शिवसेना (शिंदेगट)- 72411
के.सी पाडवी – कॉग्रेस - 69122
डॉ हिना गावित – अपक्ष – 66746
पदमाकर वळवी – अपक्ष – 5066
शहादा मतदार संघ
शहादा मतदारसंघातून भाजपाचे राजेश पाडवी हे सलग दुसऱयांदा विजयी झाले आहे. राजेंद्र गावित आणि त्यांच्या सरळ लढत मानल्या जात होती. लोकसभेच्या निकाल या मतदारसंघात कॉग्रेसला 45 हजार मतांचे मताधिक्य मिळाल्यान राजेश पाडवींसाठी धोक्याची घंटा मानल्या जात होती. मात्र मतमोजणीच्या सुरवातीपासूनच राजेश पाडवी यांनी घेतलेली आघाडी काय राहील्याने त्याचा 57 हजारांहून अधिक मताधिक्याने विजय झाला आहे. विशेष म्हणजे राज्याचे महामंत्री विजय चौधरी यांच्यासह पुर्ण जिल्ह्यातील भाजपाची कार्यकारणी या मतदारसंघात राजेश पाडवी यांच्या विजयाच्या नियोजनासाठी तळ ठोकून होती.
राजेश पाडवी – भाजपा – 146839
राजेंद्र गावित – कॉग्रेस – 93635
गोपाल भंडारी – अपक्ष – 2396
भाजपाच्या राजेश पाडवी यांचा 53204 मताधिक्याने विजय
नंदुरबार मतदारसंघ
नंदुरबार विधानस क्षेत्रातून डॉ विजयकुमार गावित सातव्यांदा विजयी झाले आहे. त्यांनी गेल्या वेळे पेक्षाही अधिकचे मताधिक्य घेवून जिल्ह्यातील सर्वात जास्तीचे म्हणजे 75 हजारांहून अधिकचे मताधिक्य घेतल्याने हा त्यांचा आता पर्यतचा सर्वात मोठा विजय मानल्या जात आहे. विशेष म्हणजे महायूतमधील शिंदे गटाने थेट त्यांच्या विरोधात कॉग्रेस उमेदवार किरण तडवी यांचा प्रचार केला होता. त्यामुळेच हि लढत रंगतदार वाटत होती. मात्र डॉ विजयकुमार गावितांच्या एकतर्फी विजयाने त्यांच्या विरोधकांची बत्तीगुल झाली आहे. असे असले तरी मुलगी डॉ हिना आणि नवापूर मधून भाऊ शरद गावित यांचा पराभवाने त्यांच्यासाठी कही खुशी कही गम च वातावारण आहे.
डॉ विजयकुमार गावित – भाजपा – 155190
इंजी किरण तडवी – कॉग्रेस – 78943
भाजपाच्या डॉ विजयकुमार गावितांचा 76247 मताधिक्याने विजय..
नवापूर -
सर्वात जास्त चुरसही नवापूर विधानसभा क्षेत्रातून पहावयास मिळाली. याठिकाणी शिरीष नाईकांच्या माध्यमातून संपुर्ण खान्देशातून कॉग्रेसचा एकमेव उमेदवार विजयी झाला आहे. याठिकाणी शेवटच्या फेरी पर्यत अपक्ष शरद गावित आघाडीवर राहीले मात्र शेवटी पोस्टल मतदानात कॉग्रेसला मिळालेल्या आघाडीच्या जोरावर शिरीष नाईकांचा विजय झाला. याठिकाणी राष्ट्रवादीचे भरत माणिकराव गावित गेल्या वेळेप्रमाणे यंदाही तिसऱया क्रमांकावर राहीले. एक हजाराहून कमी मतांनी शिरीष नाईकांच्या झालेल्या निसटत्या विजयाने अपक्ष शरद गावित समर्थकांची हिरमोड झाली आहे.
शिरीषकुमार सुरपसिंग नाईक – कॉग्रेस – 87166
शरद कृष्णराव गावित – अपक्ष – 86045
भरत माणिकराव गावित – राष्ट्रवादी – 56176
कॉग्रेसच्या शिरीष नाईक यांच्या 1121 मताधिक्याने विजय
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.