राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या 17 जागांवरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा रंगलीये. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप 12 जागांवर निवडणूक लढण्यास उत्सुक असली तरी शिंदेसेनेनं 7 जागा मागितल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मात्र, भाजप शिंदेसेनेला 3 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याचं कळतंय.. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची थेट दिल्लीत तक्रार केल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय....
आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला असतानाही शिंदेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाणे, नाशिक, जळगाव, रायगड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ या सात जागांवर उमेदवार देण्याची तयारी केलीय. विशेष म्हणजे, महायुतीत विधान परिषदेच्या जागावाटपाच्या चर्चेत एकमत झालं नसलं तरी जागावाटपावरून कुठे-कुठे दोस्तीत कुस्ती होऊ शकते पाहुयात.. कोकणातील एका जागेवरून शिंदेसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीत संघर्ष उफाळून आलाय... शिंदेसेनेकडून विकास गोगावले तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे विधानपरिषदेसाठी आग्रही आहे...
तर ठाणे आणि पालघरच्या एका जागेसाठी शिंदेसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे... ठाणे-पालघर मतदारसंघात एकूण 1 हजार 30 नगरसेवक असून भाजपचे 444 तर शिंदेसेनेचे 326 नगरसेवक आहेत. त्यामुळे युतीत शिंदेसेना ही जागा भाजपला सहजासहजी सोडणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची 71 मतं निर्णायक ठरणार आहेत...
दुसरीकडे पुण्यात भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीत संघर्ष पेटलाय... पुण्यात भाजपचे 306 तर राष्ट्रवादीचे 344 नगरसेवक निवडून आलेत.. त्यामुळे भाजपकडून गणेश बीडकर आणि राष्ट्रवादीकडून तीन जण इच्छुक आहेत...
संभाजीनगरमधून शिंदेसेनेकडून राजेंद्र गंजाळ आणि नंदकुमार घोडेले तर भाजपकडून संजय किणेकर, कैलास गोरंट्याल आणि बसवराज मंगरूळे इच्छुक आहेत.
शिंदेसेनेनं सात जागांसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं अजून आपली भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे भाजपचा १७ पैकी १२ जागांचा प्रस्ताव मित्र पक्ष मान्य करणार की मैत्रीपूर्ण लढती होणार याबाबत उत्सुकता ताणली गेलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.