Ajit Pawar Demand To Amit Shah Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीचा नवा फॉर्म्युला! भाजप १५०+, CM शिंदे, अजित पवारांना 'इतक्या' जागा? वाचा अमित शहांच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

Amit Shah On Mahayuti Seat Sharing Formula: अमित शहा यांच्या या दौऱ्यावेळी महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारतीय जनता पक्षाने १५० जागा लढवाव्या आणि शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटाने राहिलेल्या जागा वाटून घ्याव्या, असा नवा फॉर्म्युला तयार झाल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे.

माधव सावरगावे, औरंगाबाद

छत्रपती संभाजीनगर, ता. २६ सप्टेंबर

Mahayuti Seat Sharing Formula: राज्यात विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असून जागा वाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. आगामी निवडणुकांची तयारी, जागा वाटपाचा फॉर्म्युला तसेच रणनिती ठरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या या दौऱ्यावेळी महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारतीय जनता पक्षाने १५० जागा लढवाव्या आणि शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटाने राहिलेल्या जागा वाटून घ्याव्या, असा नवा फॉर्म्युला तयार झाल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक पार पडली. छत्रपती संभाजी नगर शहरातील हॉटेल रामामध्ये झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल पटेल आदी महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणूक आणि जागा वाटपाचा फॉर्मुल्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेला भारतीय जनता पक्षाने १५५ ते १६० जागा लढवाव्या आणि राहिलेल्या जागा शिंदे गट तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घ्याव्यात, असे अमित शहांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजप कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा लढणार असंही अमित शहांनी स्पष्ट केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. भाजपने १५५ ते १६० जागा लढवल्यास शिवसेना शिंदे गटाने ८० ते ८५ जागा लढवाव्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ५५ ते ६० जागा देण्यात याव्या, असा फॉर्म्युला या बैठकीत मांडला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, भाजपने १५० ते १६० जागा लढवल्यानंतर राहिलेल्या जागा वाटप करताना एकनाथ शिंदे, अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा, असंही शहांनी सुचवल्याचे सांगण्यात येत आहे. थोडक्यात भाजप १५० पेक्षा कमी जागा लढवणार नाही, असा निर्णय या बैठकीत झाल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT