MAHAYUTI SEAT SHARING DISPUTE DEEPENS AHEAD OF MUNICIPAL ELECTIONS Saam Tv
महाराष्ट्र

भाजप- शिंदेसेनेचं पुन्हा फिस्कटणार? 13 महापालिकांवरून महायुतीत रस्सीखेच

BJP–Shinde Sena Face Tough: महायुतीत जागावाटपावरून वाद कायम आहे... 13 महापालिकांमध्ये महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप आणि शिंदेसेनेत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळतेय... त्यामुळे जागावाटपाचा हा वाद कसा शमणार? भाजप आणि शिंदेसेना कोणत्या जागांसाठी आग्रही आहे?

Suprim Maskar

महापालिका निवडणुकीतील जागावाटपाबाबत एकनाथ शिंदेंच्या देवगिरी बंगल्यावर एक बैठक पार पडली... या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणही उपस्थित होते...या बैठकीत महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र निवडणुक लढवणार असल्याचं ठरलं असलं तरी 13 महापालिकांमध्ये महायुतीतील मित्रपक्षांपुढे मोठा पेच निर्माण झालाय..

13 महापालिकांमध्ये युतीचा पेच

भाजप-शिंदेसेना युती झाल्यास बंडखोरी अटळ

भाजपच्या जागांवर शिंदेसेनेचे बंडखोर उभे राहणार?

शिंदेसेनेच्या जागांवर भाजपमधून बंडखोरीची शक्यता

राष्ट्रवादीही सोबत राहिल्यास जागावाटपात अधिक गुंतागुंतीचं

नवी मुंबईत भाजप विरुद्ध शिंदेसेना थेट संघर्ष

छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगावमध्ये युती कायम ठेवण्याचं आव्हान

दरम्यान महायुतीत ठाणे हे वादाचा केंद्रंबिंदू ठरणार आहे...ठाण्यात शिंदेसेनेकडे 82 माजी नगरसेवकांचा मोठा आकडा असल्यानं भाजपच्या प्रभावातील 24 जागाही शिंदेसेनेसाठी सोडाव्या लागतील... दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप 50-50च्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही असल्याचे संकेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत..

महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी संघर्षाचं चित्र निर्माण झाल्यानं जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण झालयं... त्यात महापौर कोणाचा? इतर पदांबाबत काय? यासंदर्भात तिढा कायम असल्याचंही चित्र आहे... तसचं जे नगरसेवक आजही ठाकरेसेनेकडे आहेत, त्या जागा शिंदेंसेनेला देण्यास भाजपचा विरोध आहे. त्यात जिथे ज्याचा आमदार ती जागा त्याची.... असा फॉर्म्युलाही वापरण्यास महापालिकेत अडचण आहे...त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांनी एकत्र निवडणुकीला समोरे जाण्याचं ठरवल्यास जागावाटपानंतर दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता ही अधिक आहे....आता जागावाटपाचा तिढा महायुती कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT