Ravindra Chavan’s “number one” remark sparks heated exchanges within the Mahayuti during civic poll campaigning. saam tv
महाराष्ट्र

'एक नंबर एक नंबरच असतो'; रवींद्र चव्हाणांचा शिंदेंना चिमटा, निवडणूक प्रचारात महायुतीत घमासान

Mahayuti Clash: नगरपालिकेच्या निवडणुक प्रचारात महायुतीतले मतभेद मोठ्या प्रमाणात समोर आलेत. भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी दोन नंबरला किंमत नसते, असं म्हणत थेट एकनाथ शिंदेंनाच चिमटा काढलाय. यावरुन निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर काय हल्लाबोल केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • भाजप आणि शिंदेसेनेतला वाद टोकाला

  • भाजप आणि शिंदे सेनेचे नेते एकमेकांवर टिका करतायेत.

  • नगरपालिका निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष आमनेसामने

महायुतीत एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेच्या मंत्र्यांची नाराजी लपून राहिली नाही. फोडाफीडीच्या राजकारणावरुन नाराज झालेल्या शिंदेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची थेट दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती आहे. याचे पडसाद आता निवडणुकीच्या प्रचारातही दिसतायेत. निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकलेले भाजप आणि शिंदे सेनेचे नेते एकमेकांवर तिखट टिका करतायेत.

या पार्श्वभूमीवर 2 डिंसेबरपर्यंत युती टिकवायची आहे, असं विधान रवींद्र चव्हाणांनी केलंय. विटा नगरपरिषदेच्या प्रचारात तर चव्हाणांनी 'एक नंबर एक नंबरच असतो' असं म्हणत शिंदेंना पुन्हा चिमटा काढलाय. नगरपालिका निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष आमनेसामने आल्यानं टीकेचा धुरळा उडलाय. चव्हाणांआधी मंचरमधील सभेत एकनाथ शिंदेंनी "ज्याच्या मागे महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला" अशी घोषणाबाजी करत विरोधकांना ललकारलं होतं.

दुसरीकडे या वादात निलेश राणेंनी उडी घेत. एकनाथ शिंदे जे बोलतात, ते फायनल, असं त्यांनी चव्हाणांना टोला लगावलाय. ठाणे, सिंधुदुर्ग आणि हिंगोली जिल्ह्यात तर भाजप आणि शिंदेसेनेतला वाद टोकाला गेलाय. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यावर महायुतीत काय घडणार? आगामी जिल्हा परीषद आणि महापालिका निवडणुकीत मित्र पक्षांची भूमिका काय असणार ? याकडे राज्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : माथेरान पाच लाखाची कॅश पकडली

IND vs SA: विराटच्या शतकानंतर ड्रेसिंग रूममधून रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला होता? अखेर अर्शदीप सिंहने केला खुलासा

Suraj Chavan : "जी होती मनात तीच..."; लग्नानंतर सूरजची बायकोसाठी पहिली रोमँटिक पोस्ट

Buldhana: मतदानाच्या दिवशी राडा, ३ बोगस मतदारांना पकडलं; २ गाड्या भरून लोकांना आणलं; काँग्रेसचा आरोप

Central Bank Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT