BJP leaders in Marathwada meeting with Devendra Fadnavis, rejecting alliance with Ajit Pawar’s NCP ahead of local elections. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपचा नारा; जिथं बळ, तिथं स्वबळ, मराठवाड्यात भाजपला दादांची NCP नको?

Tension in Mahayuti: निवडणुकीआधीच महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे..कारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट फडणवीसांसमोरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीला नकार दिलाय.. मात्र हे कुठं घडलंय? महायुतीतील फुटीचा पालिका निवडणुकांवर काय परिणाम होणार?

Bharat Mohalkar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच महायुतीत फुटीची चर्चा रंगलीय.. कारण जिथं बळ तिथं स्वबळ असा नाराच भाजपनं दिलाय.. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच मराठवाड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जायला नकार दिलाय. त्याची इनसाईड स्टोरीच साम टीव्हीच्या हाती लागलीय..

मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मराठवाड्यात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.. एकवेळ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करु, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती नको, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली..त्याबरोबरच शिंदेसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्रास दिल्याचा पाढाही पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांसमोर वाचला.. त्यानंतर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, अशा सूचना फडणवीसांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..

खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीआधीच जिथं बळ तिथं स्वबळ आणि जिथे विरोधक प्रबळ तिथं युती असं जाहीर केलं.. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिलीय..

एका बाजूला भाजप पदाधिकाऱ्यांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीला विरोध होतोय.. तर दुसरीकडे शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनीच महायुतीत काही जणांकडून छळकपट सुरु असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केलीय..

मात्र मराठवाड्यात संख्याबळानुसार महायुतीत कुणाचं पारडं जड आहे?

मराठवाड्यातील 46 विधानसभांपैकी 40 जागांवर महायुतीचे आमदार विजयी झाले..यात भाजपचे 19, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 तर शिंदेसेनेचे 13 आमदार विजयी झाले आहेत.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद अत्यंत कमी आहे... तर बीडमध्ये शिंदेसेना कमकुवत आहे.. नेमकं हाच धागा पकडून भाजपने बार्गेनिंग सुरु केल्याची चर्चा रंगलीय.. मात्र निवडणुकीच्या आधीच महायुतीत फुटीची बिजं पेरली जात आहेत... त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवल्याने त्याचा महायुतीला फटका बसणार का? याकडं राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT