raigad latest  Saam tv
महाराष्ट्र

रायगडच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी, जिल्हा परिषद वादावर कसा पडला पडदा?

raigad latest news : महायुतीचा रायगड जिल्हा परिषदेतील वाद मिटल्याचे समोर आले आहे. त्यानंतर बैठकीत सत्ता वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे.

Vishal Gangurde

रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून महायुतीत तिढा वाढल्याचे पाहायला मिळालं होतं. भाजप आणि राष्ट्रवादीने शिंदे गटाला बाजूला ठेवून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये गुरुवारी बैठक झाली. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील वादावर पडदा पडल्याचे समोर आलं आहे. परंतु शिंदे गट आणि भाजपमधील पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

रायगड जिल्हा परिषदेतील शिवसेना राष्ट्रवादीतील वादावर पडदा पडला असून रायगड जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले आहेत. जिल्हा परिषदेतील वादावर पडदा पडला. आता रायगडच्या पालकमंत्री पदाचं काय असा प्रश्न, प्रलंबित आहे. यावरून राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी पुन्हा एकदा वरिष्ठांकडे बोट दाखवले आहे.

बैठकीत नेमकं काय ठरलं?

रायगडच्या जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री उदय सामंत आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात झाली. या बैठकीत रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपला देण्याचे ठरले आहे. तर सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या शिवसेनेला उपाध्यक्ष पद देण्यात आलंय.

महायुतीचा फॉर्म्युला काय ठरला?

जिल्हा परिषदेत पहिली सव्वा वर्ष भाजपचा अध्यक्ष होईल. तर अडीच वर्ष शिवसेनेला देण्यात येईल. त्यानंतर सव्वा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होईल.रायगड जिल्हा परिषदेत भाजप पहिल्यांदा सत्तेत येत आहे. भाजपकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वैकुंठ पाटील यांचं नाव आहे.

अजितदादांचा उल्लेख करताना आदिती तटकरे भावुक

रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या, याचं विश्लेषण करणाना आदिती तटकरे भावुक झाल्या. त्यांनी या विजयाच्या माध्यमातून दादांना श्रद्धांजली वाहिली असल्याच सांगितलं. मिळालेलं यश बघायला आमचा नेता नाही हे आमचं दुर्दैव आहे, अस सांगताना त्यांचे डोळे पाणावले आणि कंठही दाटून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT