Mahayuti leaders discussing BMC poll strategy as BJP pushes to sideline Nawab Malik and focus on Muslim-dominated wards. Saam Tv
महाराष्ट्र

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

BJP Excluded Nawab Malik From Mahayuti Alliance In Mumbai: मुंबई महापालिकेसाठी महायुतीची रणनीती ठरलीय...अजितदादांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवून ठाकरेसेनेला शह देण्याची खेळी भाजपानं आखलीय. मुंबईत राष्ट्रवादीला दूर का ठेवलंय? मुस्लीमबहुल वॉर्ड शिंदेंना देण्याचा प्लॅन का आखलाय?

Omkar Sonawane

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी महायुतीनं चांगलीच कंबर कसलीय. मुंबई महापालिकेत भाजपनं शिंदेसेनेसोबत लढण्याचा निर्णय घेतला असला तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवण्याची रणनीती आखण्यात आलीय. मात्र यासाठी भाजपनं नवाब मलिकांचं कारण पुढं केलंय. मुंबईत नवाब मलिक अजित दादांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व करत असतील तर राष्ट्वादीला सोबत घेणार नसल्याची भूमिका भाजपनं घेतलीय.

विशेष म्हणजे भाजपनं मुंबई महापालिका निवडणुसाठी सर्वेह केलाय. आणि या सर्व्हेत शिंदेसेनेसोबत लढल्यास १५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सर्व्हेनुसार भाजपला मुंबईत 90 ते 100 तर शिंदेसेनेला 50 ते 60 जागा मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...दोघे एकत्र 150 जागा जिंकण्याची शक्यता आहे.

मुस्लीमबहुल मतदारसंघ शिंदेंच्या वाट्याला?

मुंबईतील 18 वॉर्ड महायुतीसाठी चॅलेंजिंग असणार आहेत... त्यात सर्व्हेनुसार हे 18 वॉर्ड मुस्लीमबहुल असल्यानं भाजपला या ठिकाणी विरोध होतोय... मात्र या 18 वॉर्डमध्ये 70 टक्के मुस्लीमबहुल भागात भाजपाऐवजी एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे...कारण शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव हा मुस्लीम महिलांमध्ये आहे. त्यामुळे या वॉर्डातील जागा शिंदेंना देण्याबाबत भाजपाकडून फारशी रस्सीखेच होणार नाही..

नवाब मलिकांच्या नेतृत्त्वामुळे राष्ट्रवादीशी युती तोडत असल्याचं भाजप सांगत असलं तरी यामागे वेगळीच रणनीती असल्याचं बोललं जातंय. मुस्लीमांमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूती आहे. ही सर्व मतं ठाकरेंकडे वळू नयेत आणि त्याचं नवाब मलिकांच्या रुपात विभाजन व्हावं यासाठी राष्ट्रवादीला वेगळं लढवण्याची भाजपची खेळी असल्याचं चर्चा आता रंगू लागलीय. भाजपला नवाब मलिक नको असली तरी मतं विभाजनासाठी मुस्ली हवेत अशीच खेळी दिसतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; 4 तहसीलदारांसह दहा जण निलंबित, प्रशासनात खळबळ

मध्य रेल्वेचा जुना ब्रिज पाडताना घडली दुर्घटना; कामगाराचा मृत्यू

बीडमध्ये भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक; भयावह दुर्घटनेचा घटनाक्रम आला समोर

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

IAS Promotion : 67 IAS अधिकाऱ्यांचं प्रमोशन, आता लवकरच होणार बदली, कोणाला मिळालं कोणतं पद?

SCROLL FOR NEXT