Sadabhau Khot Saam tv
महाराष्ट्र

'माझ्या वाटेला गेलात तर, तुमच्याxxx नांगराचा फाळा..' भाषण देताना महायुतीच्या आमदाराची जीभ घसरली

MLA Sadabhau Khot: सांगोला आंदोलनादरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांना थेट इशारा दिला. भाषणादरम्यान खोत यांची जीभ घसरली असून त्यावरून वाद उफाळण्याची शक्यता आहे.

Bhagyashree Kamble

  • सांगोला आंदोलनादरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांना थेट इशारा दिला.

  • भाषणादरम्यान खोत यांची जीभ घसरली असून त्यावरून वाद उफाळण्याची शक्यता आहे.

  • खोत यांनी गोरक्षक व पोलिस शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकत असल्याचा गंभीर आरोप केला.

  • जर्सी व पोस्टन गाई कत्तलखान्यात पाठवण्याच्या विरोधातून हा वाद निर्माण झाला.

गोरक्षकांवर जहरी टीका करताना रयत क्रांतीचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांची भाषणादरम्यान जीभ घसरली. गेल्या काही दिवसांपासून गोरक्षकांकडून खोत यांना धमक्या दिल्या जात होत्या. सांगोला येथे बोलताना खोत यांनी थेट गोरक्षकांवर निशाणा साधत कडक शब्दांत प्रहार केला. मात्र, यावेळी त्यांची जीभ घसरली असून, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.

'माझ्या नादाला लागू नका. मी सोबत नांगराचा फाळ आणलेला आहे. तो नांगराचा फाळ तुमच्या xxxमध्ये घालीन', अशा शब्दांत आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांना थेट इशारा दिला. गोरक्षकांना थेट इशारा देताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यांनी केलेल्या विधानानंतर नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

'शेतकऱ्यानं कधीही खिलार किंवा देशी गाई बाजारात विकायला आणलेली नाही. हा हजारो वर्षांचा इतिहास आहे. खिलार किंवा देशी गाईची कधीच विक्री होत नाही. लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला सुरू केलं. तेव्हा मी शेतकऱ्यांची बाजू घेण्यास सुरूवात केली. मला त्यानंतर धमक्या येऊ लागल्या. अरे तुम्ही धमक्या कुणाला देताय? शेतकऱ्याच्या पोराला? मी नांगराचा फाळ आणलाय. तुम्ही जर माझ्या वाटेला गेलात, तर तुमच्या xxx नांगराचा फाळा घातल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा', असा थेट इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

गोरक्षकांच्या नावाखाली गब्बर सिंग यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. गोरक्षक आणि पोलिस मिळून शेतकऱ्याच्या घरावर दरोडा टाकत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी आमदार खोत यांनी केला.

सांगोल्यात जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्यात पाठवण्यास गोरक्षकांनी विरोध दर्शवला होता. त्याविरोधात सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनानंतर त्यांना धमक्या मिळाल्या, यावरच त्यांनी गावरान भाषेत उत्तर दिलं. मात्र, उत्तर देताना त्यांची जीभ घसरली आणि त्यातूनच नवा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT