Chhatrapati Shivaji Maharaj Statue Rajkot Fort:  Saamtv
महाराष्ट्र

Rajkot Fort : मालवण प्रकरणावरुन राज्य सरकार अलर्ट! महायुतीच्या नेत्यांची 'वर्षा'वर खलबतं; CM शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

Gangappa Pujari

गिरीश कांबळे| मुंबई, ता. २९ ऑगस्ट २०२४

मालवण येथे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Rajkot Fort) कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बोलवलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण तसेच राज्याच्या मुख्य सचिव आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मालवण प्रकरणावरुन वर्षावर बैठक

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

बैठकीत काय ठरलं?

मुख्यमंत्र्यांनी नेमलेली ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महारात्ष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

'निधी कमी पडू देणार नाही', CM एकनाथ शिंदे!

"झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT