ऑपरेशन लोटसमुळे शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्काराचं अस्त्र उगारलं खरं... मात्र फडणवीसांनी दम भरल्यानंतरही शिंदेसेनेत नाराजी कायम आहे.... आणि ते उघडपणे दिसलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या पोलीस विभागाच्या कार्यक्रमात....
हा स्टेजवरचा फोटो पाहा... यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव दिसतंय... मात्र या कार्यक्रमालाच एकनाथ शिंदेंनी दांडी मारलीय... एवढंच नाही तर शिंदेसेनेत नाराजीच्या चर्चा असतानाच महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटसची तक्रार करण्यासाठी शिंदेंनी दिल्ली गाठल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. त्यामुळे नाराजीच्या चर्चांना आणखीच जोर चढलाय... तर शिंदेसेनेतील नाराजी समोर आल्यानंतर आता विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. शिंदेसेनेच्या आमदारांचे फडणवीसच बॉस असल्याचा हल्लाबोल ठाकरेसेनेनं केलाय.. तर हिंमत असेल तर शिंदेंनी सत्तेतून बाहेर पडण्याचं खुलं आव्हानच काँग्रेसनं दिलंय...
दुसरीकडे भाजपनं मात्र सावध भूमिका घेत विरोधकांनी महायुतीत मीठाचा खडा टाकण्याचं काम करु नये, असा पलटवार केलाय.. खरंतर महायुतीच्या सत्तास्थापनेपासूनच अनेकदा फडणवीस विरुद्ध शिंदे यांच्यात कुरघोडीची चर्चा रंगली...
आधी मुख्यमंत्रिपद, त्यानंतर मलईदार मंत्रिपदं, पालकमंत्रिपदं, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, निधीवाटप अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता आहे.. त्यातच आता भाजपनं श्रीकांत शिंदेंची कोंडी करण्यासाठी शिंदेंचा निकटवर्तीय आपल्या तंबूत आणला आणि शिंदेसेनेच्या अस्वस्थतेचा कडेलोट झालाय..त्यामुळे दिल्ली दौऱ्यात तरी शिंदेंची नाराजी मिटणार का? आणि एकदिलाने महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...
मात्र ऐन निवडणूक सुरु असतानाच राज्यात महायुतीत धुसफूस सुरु असल्यानं महायुतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.