Mahayuti News Saam Tv
महाराष्ट्र

Local Body Elections : वाद टोकाला! राष्ट्रवादीसोबत लढणार नाही, शिंदेंच्या आमदारांची रोखठोक भूमिका

Mahayuti Rift in Raigad: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये महायुतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. आमदार महेंद्र दळवी व मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्याशी युती न करण्याचे जाहीर करत गंभीर आरोप केले आहेत.

Namdeo Kumbhar

Dalvi, Gogawale Oppose Alliance with Tatkare Ahead of Local Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी महायुतीमधील वाद शिगेला पोहचला आहे. रायगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांचा चिटर फॅमेली म्हणून उल्लेख केला.

महेंद्र दळवी काय म्हणाले ?

आपले नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून आपण सुनील तटकरे यांना निवडून आणले. परंतु निवडून आल्यावर त्यांनी आपला रंग दाखवला. आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहोत, परंतु त्यात सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी नसेल असं अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केलं. मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. दळवी यांनी तटकरे यांचा चिटर फॅमेली असा उल्लेख करीत अंतुलेसाहेबांपासून ते सर्वसामान्य कार्यकत्याला ज्याने फसवलंय त्याला रायगडच्या राजकारणातून हद्दपार करण्याचा अवाहन दळवी यांनी केले. मालकत्व आणि पालकत्व असा उल्लेख करीत पालकमंत्री पदावरून देखील दळवी यांनी तटकरे यांच्यावर टीका केली.

महायुती नाही तर युती, गोगावले काय म्हणाले ?

आपल्या अभिष्टचिंतन सभेला उत्तर देताना मंत्री भरत गोगावले यांनी कोकणात महायुती नाही तर युती असा उल्लेख करीत राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना वगळून मंत्र्‍यांचं गणित मांडत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीला सज्ज होण्याच्या सूचना केल्या. या वेळी नॅपकीन विषयावरून त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत वेटर खांद्यावर नॅपकिन घेत असल्याची टीका केली. टीका करा आम्ही त्याला भीक घालत नाही, असा इशारा देखील गोगावले यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत रक्ताचं पाणी करून फिरल्याचा उल्लेख करीत महाडमध्ये पडलेल्या मतांची गणित मांडत असताना आदितीच्या श्रीवर्धन मतदार संघात मत कमी का पडली याचा हिशेब करण्याचा सल्ला गोगावले यांनी तटकरेंना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT