Maharashtra Politics: महायुतीला अजित पवारांचं ओझं? राष्ट्रवादीच्या मतदारसंघात महायुतीची पिछेहाट?
Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीला अजित पवारांचं ओझं? राष्ट्रवादीच्या मतदारसंघात महायुतीची पिछेहाट?

Tanmay Tillu

महायुतीत सारं काही आलबेल नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यामुळे भाजप आणि शिंदे गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं कळतंय. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची कामगिरी सुमार झाली. मिशन 45 हाती घेणाऱ्या महायुतीला निम्मे जागाही मिळाल्या नाहीत.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन काय फायदा झाला, अशी चर्चा त्यानंतर सुरु झाली. भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझरनं'नं तर थेट अजित पवारांवर पराभवाचं खापर फोडलं यानंतर आता भाजप-राष्ट्रवादीच्या काडीमोडाची चर्चा जोर धरु लागलीये..त्यामुळे महायुतीला अजित पवारांचं ओझं झाल्याची चर्चा रंगलीय.

त्यामुळेच आता महायुतीनं लोकसभेतल्या विधानससभा निहाय मताधिक्याचं गणित मांडायलंय. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचे भाजप आमदारांनी मत व्यक्त केल्याचे समजते. असे कोणकोणते मतदारसंघ आहेत जिथे भाजप आणि शिंदेंच्या उमेदवारांना फटका बसला ते बघूयात.

दादांच्या मतदारसंघात भाजप-सेनेला फटका?

माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ, शिरूर मतदारसंघ

सोलापूरातील मोहोळ विधानसभेत राम सातपुतेंना कमी मतं

मोहोळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे यशवंत माने आमदार

माढ्यात रणजितसिंह निंबाळकर पराभूत, तिथे अजित पवारांचे 2 आमदार

दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवारांचा पराभव

दिंडोरीतील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे आमदार

आढळराव पाटलांच्या शिरुरमध्ये 4 आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे

या कारणामुळे अजित पवार यांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार सुनील तटकरेंनी मात्र दादांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केलाय.

भाजपची अजित पवारांबाबत धरलं तर चावतंय..सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाल्याचं चित्र आहे. अजित पवारांना सोबत घेऊनही लोकसभेत जर फायदा झाला नसेल तर विधानसभेत याचा कितपत फायदा होणार याबाबत महायुतीतल्या नेत्यांना शंका आहे. त्यामुळेच अजित पवार भाजप आणि शिंदे गटासाठी ओझं ठरू लागले आहेत का याचीच चर्चा आता रंगू लागलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Updates : मराठा आरक्षणावर १० जुलैला पुन्हा सुनावणी, मागासवर्ग आयोगाला न्यायालयाने जारी केली नोटीस

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी कायदा आणणार!

Business Tips : नवीन व्यवसाय सुरू करताय? 'या' टिप्स फॉलो करा, महिन्यात व्हाल मालामाल

Health Tips: सकाळी या पदार्थांचं सेवन करा अन् ॲसिडिटीला करा गुडबाय

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना! फॉर्म कुठे आणि कसा भरायचा?

SCROLL FOR NEXT