Sakshi Sunil Jadhav
थंडीत मनाली म्हणजे बर्फांचे पर्वत, शांत निसर्ग आणि थंडगार हवा. पण सोलंग व्हॅली, मॉल रोडपलीकडेही खरी, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणं आहेत.
मनालीपासून फक्त 12 किमी अंतरावर असलेलं हे छोटंसं गाव हिवाळ्यात संपूर्ण बर्फात न्हाऊन घेतल्यासारखं वाटतं. इथे फारशी गर्दी नसते. स्नोफॉल, स्नो ट्रेकिंग आणि शांत पिकनिकसाठी उत्तम ठिकाण आहे.
पर्यटकांपासून दूर असलेली ही व्हॅली नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहे. हिवाळ्यात इथलं शांत वातावरण, बर्फांमध्ये हिरवीगार पडलेली झाडं आणि स्वच्छ हवा मनाला वेगळाच आनंद देते.
मनालीपासून फक्त 20 किमी अंतरावर असलेलं नग्गर गाव नाग्गर किल्ला, इतिहास आणि निसर्ग यांचं सुंदर मिश्रण आहे.
सोलंग व्हॅलीपेक्षा कमी गर्दी असलेलं गुलाबा हिवाळ्यात पिकनिक, फोटोग्राफी आणि शांत वेळ घालवण्यासाठी योग्य ठरतं.
गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रसिद्ध असलेलं वशिष्ठ गाव थंड हवामानात गरम पाण्याचा अनुभव आणि शांत गावच्या घरासारखा अनुभव देतं.
मनालीजवळचं हे शांत गाव धार्मिक आणि नैसर्गिक दृष्टीने महत्त्वाचं आहे. इथे बर्फाची शिखरं आणि शांतता अनुभवायला मिळेल.
मॉल रोडजवळ असूनही कमी प्रसिद्ध असलेलं सियाल गाव शांत पिकनिक स्पॉट म्हणून ओळखलं जातं. इथलं हिमालयाचं दृश्य मन मोहून टाकतं.
हिवाळ्यात हा धबधबा गोठलेला दिसतो, जो एक युनिक आणि खरी अनुभव देणारी जागा आहे.