Maharashtra Cabinet Expansion : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाचा शपथविधी आज नागपूरमध्ये पार पडणार आहे. भाजपचे १९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ आणि शिवसेनेचे १२ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दुपारी चार वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. सर्व आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन गेले आहेत.
भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह २१ मंत्रिपदे आली आहेत. भाजपचे १९ मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिवसेनेला १२ मंत्रिपदे मिळणार असून ११ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीला 10 खाती मिळाली असून ९ मंत्री आज शपथ घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपमधून माधुरी मिसाळ, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे,मेघना बोर्डीकर याना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे. तर राष्ट्रवादीमधून दत्ता भरणे आणि नरहरी झिरवळ यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. शिवसेनेतून भरत गोगावले, योगेश कदम यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेय. पाहूयात कोण कोणते मंत्री असतील...
भाजपमधून कोण कोण मंत्रिमंडळात? (BJP Cabinet Minister List)
देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री, गृहमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
माधुरी मिसाळ
अतुल सावे
आकाश फुंडकर
अशोक उईके
जयकुमार मोरे
संजय सावकारे
आशिष शेलार
अजित पवार, उपमुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय
अदिती तटकरे
हसन मुश्रीफ
बाळासाहेब पाटील
दत्ता भरणे
नरहरी झिरवळ
मकरंद आबा पाटील
इंद्रनील नाईक
धनंजय मुंडे
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, नगरविकास
उदय सामंत
संजय शिरसाट
शंभुराजे देसाई
दादा भुसे
गुलाबराव पाटील
भरत गोगावले
प्रताप सरनाईक
संजय राठोड
योगेश कदम
आशिष जैस्वाल
प्रकाश अबिटकर
शिंदेंच्या मंत्रिमंडळातील मंत्री, पण फडणवीस सरकार संधी नाही? शिंदे सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या या आमदारांना अद्याप मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन आलेला नाही.
तानाजी सावंत
दीपक केसरकर
अब्दुल सत्तार
सुरेश खाडे
विजयकुमार गावित
छगन भुजबळ (शपथविधीसाठी फोन नाही)
दीलीप वळसे पाटील
संजय बनसोडे (शपथविधीसाठी फोन नाही)
धर्मरावबाबा आत्रम
सुधीर मुनगंटीवार
रवींद्र चव्हाण
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.