Leaders from Mahayuti and MVA during discussions over local body election strategy in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुती आणि मविआची रणनीती काय? पालिका निवडणुका स्वबळावर की युतीत?

Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने नवी रणनीती आखलीय.. मात्र ही निवडणूक स्वबळावर लढली जाणार की युतीत? याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीवर विधानपरिषदेचं गणित कसं अवलंबून असणार आहे?

Bharat Mohalkar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय.. मात्र लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित लढलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीनेही स्वबळाची चाचपणी सुरु केलीय..एवढंच नाही तर शिंदेसेनेनं भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना गळाला लावून फिल्डिंग लावलीय..शिंदे सेनेनं सिंधुदूर्गात राणेंचे विरोधक राजन तेलींना प्रवेश देत भाजपला अस्थिर करण्याची रणनीती आखलीय..

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये दरी वाढत चालली आहे. नवी मुंबईत शिंदेंनी नाईक समर्थकांना गळाला लावल्याने गणेश नाईकही शिंदेसेनेविरोधात आक्रमक झालेत..यावेळी नाईकांनी थेट स्वबळाचा नारा दिलाय.. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिंदेसेनेने आक्रमक रणनीती अवलंबली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही आपली भूमिका स्पष्ट केलीय.. तर महाविकास आघाडीबाबत ठाकरे सेनेने मात्र सावध भूमिका घेतलीय..

खरंतर राज्यात 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत..

आता 34 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्या, 125 नगरपंचायती, 232 नगरपरिषदा आणि 29 महापालिकांच्या निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे.. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेला एकत्र लढणारे सर्वच पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची चाचपणी करत आहेत..मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेसाठी निवडून जाणाऱ्या २२ आमदारांचं गणित लक्षात घेता महायुती आणि महाविकास आघाडी स्वतंत्र नशीब आजमावणार की एकीची वज्रमूठ आवळून संख्याबळ वाढवणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT