Jan Suraksha Bill Saam tv
महाराष्ट्र

Jan Suraksha Bill : जन सुरक्षा कायद्याला विरोध; राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, कायदा रद्द करण्याची मागणी

Mumbai Nagpur News : जन सुरक्षा कायद्यामुळे लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न असल्याने कायदा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून राज्यव्यापी आंदोलन

Rajesh Sonwane

Jan Suraksha Bill : महाराष्ट्र शासनाने विधानसभेत जन सुरक्षा कायदा संमत केला. मात्र त्याला अनेक राजकीय पक्षांकडून विरोध केला जात आहे. या कायद्यामुळे लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न असल्याने हा कायदा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले असून आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहेत. 

मनमाडमध्ये ठाकरे गटाचे आंदोलन 

नाशिक : राज्य शासनाकडून संमत करण्यात आलेला जन सुरक्षा कायद्याला विरोध केला जात आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा; या मागणीसाठी मनमाड येथे तलाठी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटातर्फे निदर्शने करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. 

विधेयक विरोधात कोल्हापुरात मोर्चा 
कोल्हापूर : जन सुरक्षा विधेयक रद्द करावं, या मागणीसाठी आज इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातील महावीर गार्डन इथून मोर्चा सुरू झाला असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चामध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. मोर्चानंतर इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल एडके यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.

संभाजीनगरात निदर्शने 

जन सुरक्षा कायदा रद्द करा; या मागणीसाठी महाविकास आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात भव्य निदर्शने करण्यात आली. जनविरोधी घटनाविरोधी लोकशाही हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा; या मागणीसाठी महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

मुंबईतही आंदोलन 
ठाकरे गटाकडून जन सुरक्षा कायद्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे. जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेचे आंदोलन केले जात असून मुंबईत देखील शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते आंदोलनाला उपस्थित आहेत. तसेच नागपूरात देखील मविआकडून आंदोलन करत विधेयकाला विरोध करण्यात आला. 

माविआचे जोरदार निदर्शने 

जन सुरक्षा विधेयक सामान्य जनतेच्या हक्कावर गदा आणणारे असून सरकारने बहुमताच्या जोरावर सभागृहात हे विधेयक पास केले. मात्र जनतेच्या हक्कावर गदा येत असल्याने याला विरोध करण्यासाठी आज महाविकास आघाडीकडून नागपूरच्या व्हेरायटी चौकात बिल विरोधात विरोध प्रदर्शन करण्यात आलं. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होतो मात्र उबाठाचे कार्यकर्ते या आंदोलनाकडे फिरकले नसल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: उपराष्ट्रपतीच्या मतदानावेळी इंडिया आघाडीची नाही तर BJPची मतं फुटली, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

Nepal News : महाराष्ट्रातील १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले, सर्वाधिक पर्यटक 'या' जिल्ह्यातील | VIDEO

Maharashtra Live News Update : माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण, पूजा गायकवाडला 3 दिवसाची पोलीस कोठडी

लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण; तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात खासदार निंबाळकर आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Viral : घोर कलयुग! मंदिरात नाचवली रशियन तरुणी, Video पाहून लोक संतापले

SCROLL FOR NEXT