संजय राऊतांच्या अंगात आलं अन्...! वाचा काय म्हणाले विश्वजित कदम Saam TV
महाराष्ट्र

संजय राऊतांच्या अंगात आलं अन्...! वाचा काय म्हणाले विश्वजित कदम

महाराष्ट्राच्या इतिहासात अशा गोष्टी कधी घडल्या नाहीत त्या आता घडत आहेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूर: 'शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अंगात आलं अन् महाविकस आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) झालं' अंगात आलं ते बरंच झालं' असं विधान काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम (Dr. Vishwjit Kadam) यांनी सोलापुरात केलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अशा गोष्टी कधी घडल्या नाहीत त्या आता घडत आहेत. महाविकास आघाडी सरकार हे संजय राऊत यांच्या अंगात आल्याने अस्तित्वात आलं आहे आणि जे झालं ते चांगलंच झालं असं वक्तव्य सोलापूर (Solapur) दौऱ्यावर असताना डॉ. विश्वजित कदम यांनी केलं आहे. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'आजी माजी आणि भावी' या विधानावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. भाजप आणि शिवसेना युतीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. अनेक जेष्ठ नेते आपआपल्या परिने प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच विश्वजित कदम यांचं हे वक्तव्य पुन्हा नवीन राजकीय चर्चांना उधान आणंत का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT