Maharashtra Assembly Election 2024  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024 : बंडखोरांना चॉकलेट ! बंडखोरी शमवण्यासाठी 'ऑपरेशन समजूत'

Assembly Election 2024 : महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीनेही बंडखोरी शमवण्यासाठी विशेष रणनीती आखलीय. तर त्यासाठी बंडोबांना थंड करण्यासाठीची जबाबदारी महायुतीच्या नेत्यांवर देण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत बंडखोरांनी महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवलीय. 288 जागांसाठी तब्बल 7 हजार 996 अर्ज दाखल करण्यात आलेत. त्यामुळे बंडखोरी शमवण्यासाठी महाविकास आघाडीने नवा प्लॅन आखलाय.

मविआकडून बंडखोरांना चॉकलेट

काँग्रेसकडून चेन्निथला आणि अशोक गेहलोत यांच्याकडून मुंबई आणि कोकणातील बंडखोरांशी चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांकडून बंडखोरांशी चर्चा होत आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांकडून बंडखोरी मागे घेण्याची विनंती केली जात आहे. मविआतील अधिकृत उमेदवाराविरोधात माघारीचा निर्णय मविआच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. बंडखोरांशी संपर्क करून विधानपरिषद आणि महामंडळावर वर्णी लावण्याचं आश्वासन मविआकडून देण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीनेही बंडखोरी शमवण्यासाठी विशेष रणनीती आखलीय. तर त्यासाठी बंडोबांना थंड करण्यासाठीची जबाबदारी महायुतीच्या नेत्यांवर देण्यात आली आहे.

महायुतीची बंडोबांसाठी विशेष रणनीती

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत रणनीती बनवली आहे. बंडखोरी शमवण्यासाठी स्वतः फडणवीस आणि बावनकुळे मैदानात उतरलेत. बंडखोरांना मुंबईत बोलवून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. दानवे, कराड, मुनगंटीवार, शेलार, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीयांवर बंड शमवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

महायुतीत असलेली पक्षांतर्गत आणि क्रॉस बंडखोरी करणारे उमेदवार नक्कीच माघार घेतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय.

बंडखोरांच्या बंडखोरीमुळे यंदा निवडणुकीची रंगत वाढलीय. त्यामुळे बंडखोरी शमवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून ऑपरेशन समजूत सुरू आहे. यामध्ये कुणाचं ऑपरेशन समजूत यशस्वी ठरणार? यावर सत्तेचा मार्ग अवलंबून असणारं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राजू शेट्टींना धक्का, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फूट, मोठ्या नेत्याने साथ सोडली

Lakshmi Pujan : 'या' चुकांमुळे धनलक्ष्मी प्रसन्न होत नाही; वाचा आणि पूजा करताना लक्षात ठेवा

Maharashtra News Live Updates : संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून?

Shahapur Vidhan Sabha : शहापूरमध्ये उबाठाचे दोन गट; मविआच्या उमेदवाराची अडचण, नाराजांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Rinku Singh: 'गॉड्स प्लान',55 लाख ते 13 कोटी; 2265.64 टक्के हाईक अन् रिंकूने खरेदी केलं स्वप्नातलं घर

SCROLL FOR NEXT