Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: नागपूर मधील कॅम्पस चौकावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 09 April 2025: आज बुधवार दिनांक ०९ एप्रिल २०२५ , पुण्यात विदेशी महिलेवर अत्याचार, मंगेशकर रूग्णालय प्रकरण, महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट, बीड संतोष देशमुख हत्याकांड अपडेट, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

नागपूर मधील कॅम्पस चौकावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

कॅम्पस चौकावरून चारही बाजूंनी जाणाऱ्या रस्त्यांवर शेकडो वाहन अडकलेत. अमरावती रोड वरून संध्याकाळी वाडी, दाभा, फुटाला, काचिमेट, अंबाझारीच्या दिशेने घरी परत जाणाऱ्या नागपूरकरांची मोठी अडचण निर्माण झालीय.

मुंब्रा रेल्वे ट्रॅकवर भीषण आग

रेल्वे ट्रॅक वरील गवताचा वनवा पेटल्याने फास्ट अप आणि डाउन लाईनवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bhandra Rain: भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी 

भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. तुमसरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. प्रचंड वादळी वाऱ्यानं भंडारा शहरातील शास्त्री चौकातील एका चायनीज दुकानावर वृक्ष कोसळले. तर, दुसरीकडं तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी इथं वीज तारांवर वृक्ष कोसळल्यानं त्या परिसरातील सुमारे २५ गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय.

Beed News:   गेवराईजवळील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला भीषण आग

बीडच्या गेवराई जवळील धुळे सोलापूर आष्टी महामार्गावरती एका कंटेनरला भीषण आग लागली आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेवराई जवळ ही घटना घडलीय. आगीत कंटेनर जळून खाक झाला आहे.

प्रशांत कोरटकरला रस्त्यावर दिसल्यावर मारणार, संभाजी ब्रिगेड इशारा

प्रशांत कोरटकर याला जामीन मिळाल्याचे कळलं. कोरटकर ही विकृती आहे. खरंतर सरकारने त्याला बाहेर सोडू नये. परंतु कोरटकर, ये तू बाहेर, तुला जोड्याने हाणल्याशिवाय शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय.

ठाणे ते बोरिवली प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात पार होणार

बोरिवली ते ठाणे दोन तासाचे अंतर आता अवघ्या वीस मिनिटात पार होणार. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गांत अडथळा ठरणाऱ्या बोरिवलीतील झोपडीधारकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. एमएमआरडीए च्या माध्यमातून बोरिवली ते ठाणे भुयारी मार्गाचा काम लवकरच सुरू होणार आहे.

पुण्यात उबर रिक्षा सेवेत नवा बदल, आता मीटरप्रमाणेच भाडे आकारले जाणार

मोबाईल अ‍ॅपवरून रिक्षा सेवा देणारी ‘उबर’ कंपनी आता नव्या नियमांनुसार प्रवाशांकडून मीटर प्रमाणेच भाडे आकारत आहे. 18 फेब्रुवारीपासून उबरने त्यांच्या चालकांशी असलेल्या करारात बदल केला असून, नव्या अटींनुसार उबर दर ठरवत नाही, तर प्रवासी आणि चालकांमध्येच भाड्याचा निर्णय घेतला जातो. यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTA) निश्चित केलेले मीटर दर लागू केले जात आहेत.

Kalyan : मनसे कार्यकर्त्यांनी एमएमआरडीएच्या फलकांना काळे फासले 

एम एम आर डी ए चा कामादरम्यान हिंदी मध्ये मार्गदर्शक फलक

मनसे कार्यकर्त्यांनी हिंदीमध्ये लिहिलेल्या फलकाला काळे फासले

कल्याण शीळ रस्त्यावर सुरू आहे एम एम आर डी ए अंतर्गत मेट्रोचे काम

Hingoli : पीडब्लूडी अधिकाऱ्यांवर शिवेंद्रराजे भोसले संतापले

मुख्यालय सोडून इतर जिल्ह्यात वास्तव्यास राहणाऱ्या पी डब्लू डी अधिकाऱ्यांवर शिवेंद्रराजे भोसले संतापले. या पुढे असे प्रकार घडले तर कार्यवाही करणार, असा इशारा शिवेंद्रराजे यांनी दिला.

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांचं उपोषण अखेर मागे

खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण अखेर मागे घेतलं आहे. शासनाने रस्त्याचं काम करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं .

खासदार सुप्रिया सुळे यांची अधिकाऱ्यांबरोबरची चर्चेची पहिली फेरी निष्फळ

- ⁠अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्त आणि नवीन काम सुरु करण्यासाठी वीस दिवसांचा वेळ मागितला

- ⁠ सुप्रिया सुळे यांनी 14 दिवसात रस्त्याचे काम सुरू करा अशी मागणी केली

- ⁠त्यानंतर अधिकारी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे चर्चेसाठी रवाना

नागपूरमध्ये फटाका दुकानाला भीषण आग

घटनास्थळी अग्निशमन जवान दाखल

नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वारा व गारांचा पाऊस

नांदेडच्या उमरी तालुक्यातील कुदळा भागात जोरदार पाऊस.

शेती पिक व फळबागायतच शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाण नुकसान.

जालन्यात तापमान 42 अंशावर , रस्त्यावर शुकशुकाट, बाजारपेठेत शुकशुकाट

विदर्भानंतर मराठवाड्यात देखील उष्णतेची लाट आली असून जालना जिल्ह्यात तापमान 42 अंशावर गेल आहे. तर मागील दोन दिवस तापमान 41 अंशावर होतं. जालन्यात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवूलागल्याने रस्त्यावर आणि बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळतोय.

सोलापूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम

सोलापूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम

जिल्हा कारागृह प्रशासनाकडून पाणी मिळवण्यासाठी अजब आणि तितकाच धक्कादायक प्रकार

कारागृहात कमी दाबाने पाणी पुरवठा होतं असल्याने जेल प्रशासनाने जानेवारी 2025 मध्ये पालिकेला पत्र लिहीत नवीन कनेक्शनची केली होती मागणी

मात्र वेगवेगळ्या कारणामुळे पालिकेने कनेक्शन दिलं नसल्याने स्वतःहून कैद्याच्या माध्यमातून सुरूय खोदकाम

मात्र अशा पद्धतीने गर्दीच्या ठिकाणी भर रस्त्यात खोदकाम करताना एखाद्या कैद्याने पलायन केल्यास कोण जबाबदार?

दरम्यान काम थांबवून कैदी पुन्हा कारागृहात नेण्यात आले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांचे गेले पाच तासापासून उपोषण धरणे आंदोलन सुरूच

खासदार सुप्रिया सुळे यांचे गेले पाच तासापासून उपोषण धरणे आंदोलन सुरूच

पुण्यातले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुप्रिया सुळे करत आहेत उपोषण

सुप्रिया सुळे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलनस्थळी झोपल्या

मतदार संघातील रस्त्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांचे उपोषण सुरूच

प्रशासनाकडून आंदोलनाची दखल नाहीच..

तानाजी मुटकुळे यांच्या तक्रारीनंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार

तानाजी मुटकुळे यांच्या तक्रारीनंतर कॅबिनेट मंत्री शिवेंद्रराजे भोसले भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार.

अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून तानाजी मुटकुळे यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करत कोट्यावधी रुपयांची कामे मिळवल्याने मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली होती तक्रार.

हिंगोलीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा निधीवरून वाद सुरू.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बिडी बांगर यांनी तीर्थक्षेत्र विकास निधी मधून कोट्यावधी रुपयांची कामे तानाजी मुटकुळे यांच्या मतदारसंघात प्रस्तावित केली.

पुण्यातील प्रसिद्ध सोसायटीच्या सुरक्षा रक्षांकडून मारहाण

पुण्यातील नांदेड सिटी मध्ये असलेल्या मधुवंती सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून तरुणाला बेदम मारहाण

वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाला शिवीगाळ, मुलाने जाब विचारल्यावर मारहाण

याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने पोलिसाय तक्रार दिली आहे

नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी आणि अश्विनी नामक महिलेवर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हा सगळा प्रकार ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ४.३० वाजता घडला

खासदार सुप्रिया सुळे गेले चार तासापासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उपोषण करत आहेत.

Maharashtra News Live Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचा बेमुदत धरणे आंदोलन अजूनही सुरूच

खासदार सुप्रिया सुळे गेले तीन तासापेक्षा जास्त वेळ जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण आंदोलन करत आहेत

उन्ह वाढलेला आहे त्यामुळे सुप्रिया सुळे जिल्हाधिकारी कार्यालय समोर असलेल्या झाडाखाली झोपल्या आहेत... उन्हाचा त्रास होऊ लागला आहे.

नागपुरातील गांधी सागर तलाव बचावचा नारा देत आंदोलन...

- गांधी सागर तलावाजवळ केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट कडून आंदोलन..

- गांधी सागर तलावच खोलीकरण करून सौंदर्यीकरण केलं जातं आहे.

- मात्र सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तलावाचा सत्यानाश होत असल्याचा आरोप करत करण्यात आलं आंदोलन.

- महापालिकेने योग्य प्रकारे काम केलं नसून त्या कामाला विलंब होत आहे म्हणत केलं आंदोलन...

तुळजापूर ड्रग्स प्रकरणात पुजारी किंवा पुढारी बघून तपास नाही तर गुन्हेगार म्हणून पोलिसांचा तपास

पुजाऱ्यांची नाव आल्यावर मंदिर संस्थान अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात असून

त्यांना पुजार्यांबाबत योग्य ती माहिती पोलिसांनी दिली

ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी निश्चित 14 आरोपी अटक बाकी आरोपींचा शोध सुरू

संजय जाधव यांच्याशी बातचीत केले आहे आमचे धाराशिव चे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी

जालन्यात पाण्याअभावी मोसंबीच्या बागा संकटात

जालन्यात पाण्याअभावी मोसंबीच्या बागा संकटात, अंबड तालुक्यातील शिरढोण आणि परिसरात मोसंबी बागांवर शेतकरी चालवताय जेसीबी...

एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी पातळीत घट, मोसंबी बागा वाचवण्याचं मोसंबी उत्पादकांसमोर आव्हान..

अँकर: जालन्यातील अंबड तालुक्यातील शिरढोण गावामध्ये अनेक शेतकरी पाण्याअभावी आपल्या मोसंबी बागांवर जेसीबी चालवताना पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील नागरिकांना एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहे.विहिरीने तळ गाठला असून याचा थेट परिणाम मोसंबी उत्पादक शेतकऱ्यावर होताना पाहायला मिळतोय.

वर्षभरात तळीरामांनी रिचवली अडीच कोटी लिटर 'देशी-विदेशी'

महागाई कितीही वाढत असली तरी तळीरामांचा मद्यावर होणारा खर्च कमी न होता वाढतच आहे. सन २०२३-२४ या वर्षाच्या तुलनेत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मद्याचा खप वाढला आहे. देशी, विदेशी, बिअर, वाईन याची बेरीज केली तर दोन कोटी ४८ लाख ७७ हजार ७९६ लिटर मद्य जिल्ह्यातील तळीरामांनी एका वर्षात रिचविले आहे. अवैध दारू विक्री, गावठी दारू भट्टया बंद करणे यामुळे वरील मद्याकडे तळीराम वळले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलातही वाढ झाली आहे.

धुळ्यात तापमानाचा कहर, रस्ते झाले निर्मनुष्य

धुळ्यात तापमान वाढीचे चटके धुळेकर नागरिकांना चांगलेच जाणवु लागले आहेत, धुळ्यात गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे 42 अंशापेक्षा जास्तीच तापमान धुळ्यात नोंदविल गेल आहे, त्या वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर देखील होऊ लागला आहे,

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा बेमुदत धरणे आंदोलन अजूनही सुरूच..

जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू

गेले दीड तासापासून सुप्रिया सुळे धरणे आंदोलनावर ठाम

जिल्हाधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी दोन्हीही कार्यालयात असून सुद्धा सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी अजून आलेले नाहीत.

सध्या पुण्यात उन्ह कडक आहे,कडक उन्हात सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांसमवेत दरम्या आंदोलन करत आहेत

धुळ्यात तापमानाचा कहर

सलग तीन दिवसांपासून तापमानाचा पारा 42 अंश पार

वाढत्या तापमानामुळे रस्त्यावर नागरिकांचा शुकशुकाट

वाढत्या तापमानामुळे नागरिक घराबाहेर न पडणार करत आहेत पसंत

तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज...

अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी नाविंदगी,अंदेवाडी,शावळ, वागदरी,शिरवळ, भुरीकवठा, बादोले भागात पावसाने केली जोरदार बॅटिंग

अचानक अलेल्या गारांच्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जनजीवन झाले विस्कळीत

गारांच्या पावसाचा अक्कलकोट तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता

Jalna News: जालन्यात शेतकऱ्यांचे आंदोलन

जालन्यातील चापडगाव येथे एसटी बससमोर टायर जाळून शेतकऱ्यांनी केले आंदोलन...

राणीउचेंगाव ते राजनी या रस्त्यावरील चापडगाव येथे शेतकऱ्याच आंदोलन...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील आठ दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे..

हाडशी येथे आंब्यांची वणव्याने ३०० झाडे जळाली, शेतकऱ्याचे २९ लाखांचे नुकसान

हाडशी येथील प्रगतशील शेतकरी संतोष दगडू शेलार यांच्या गट नंबर ६४३ मधील आठ एकर क्षेत्रातील ३०० आंब्यांची झाडे आगीचे भक्षस्थानी पडली आहेत व यात त्यांचे अंदाजे २० लाखांचे नुकसान झाले आहे. काल दुपारी साडेबाराचे सुमारास अज्ञाताने लावलेल्या वणव्यात शेलार यांच्या शेतातील ३०० आंब्याची झाडे जळून खाक झाली आहेत आगीच्या ज्वाळा २० ते २५ फूट उंचीच्या होत्या त्यामुळे भर दुपारी ही आग विझवण्यासाठी अडचण येत होती अर्धा ते पाऊणतासात संपूर्ण आंबा बागेस आगीने वेढा दिला व सुमारे बावीस वर्षांपासून पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केलेली आंबा बाग डोळ्यांदेखत जळून गेली

नाशिकमध्ये गोदावरी प्रदूषणाबाबत मनसे आक्रमक

- मनसे कार्यकर्त्यांच्या गोदावरीत उड्या मारत आंदोलन

- गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे यासाठी आंदोलन

Solapur News: सोलापूरात पती-पत्नीवर गोळीबार; ४ वर्षांच्या जुन्या वादातून हल्ला

- मोहोळ तालुक्यात चार वर्षांपूर्वी जुन्या वादातून पती-पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना, पत्नीची प्रकृती चिंताजनक

- मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर गोळीबारचा थरार, हल्ला करणारा हल्लेखोर फरार

- शिवाजी पुंडलिक जाधव, सुरेखा शिवाजी जाधव या पती-पत्नीवर पिस्तूल मधून गोळ्या झाडून ठार मारण्याचा करण्यात आला प्रयत्न..

- शिवाजी जाधव यांना एक गोळी तर सुरेखा जाधव यांना तीन गोळ्या लागल्याचा प्राथमिक अंदाज..

- गोळीबार करणारा दशरथ केरू गायकवाड करणाऱ्या आरोपीचे नाव..

- शिवाजी जाधव (65) आणि सुरेखा जाधव (60) यांच्यावर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू, सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक

Phaltan News: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा आहेर

फलटणचे आमदार सचिन पाटील यांची रामराजेंच्या नव्याने सुरुवात होणाऱ्या संघर्ष समितीवर टीका

वाठार स्टेशन येथे फलटण विधानसभा मतदारसंघातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांनी त्यांच्याच पक्षातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केलीये.... मागील तीस वर्षात उत्तर कोरेगावच्या पाणी प्रश्न बाबत सत्तेत असताना हे लोक कुठे होते संबंधित विभागाचे ते मंत्री होते. अध्यक्ष, आमदार होते यावेळी त्यांची संघर्ष समिती कुठे गेली होती.. या भागातल्या 26 गावातील पाणी प्रश्न सोडवला नाही तर मला त्या ठिकाणी मत मागण्याचा अधिकार नाही.. हे त्यांनी पाळावे. आता संघर्ष समितीचे सर्व संपले असून आपलं वय झालंय आता नवीन संघर्ष करून काही उपयोग होणार नाही. तीस वर्षांपूर्वी या तालुक्यातील 26 गावांचा प्रश्न मार्गी लागू शकला असता पण आपण ते मनात आणले नाही.

Jalgaon News: जळगावात अति उष्णतेने वीजतारा वितळल्या

मागील काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यात 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी दुपारच्या उन्हाच्या झळा आणि वीज वाहक तारांवर आलेला अतिरिक्त लोड यामुळे आकाशवाणी चौकातील विजतारा वितळून एकमेकांवर चिपकल्याने मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर तब्बल तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते

सोलापुरात विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू

सोलापुरातील जुना एम्प्लॉयमेंट चौकातील कोनापुरे चाळ मधील धक्कादायक घटना

राजनंदिनी अणय कांबळे असे मरण पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

मुलुंड टोल नाक्यावर ट्राफिक, वाहनांच्या लांबच लांब रांगा

ठाण्याच्या मुलुंड टोल नाक्यावरती ट्राफिक

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहनाच्या लांबच लांब रांगा

मुंबईच्या दिशेने जाणारा नागरिकांना मनस्ताप

आधार 'लिंकिंग' न केल्यास रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता

जळगाव जिल्ह्यात सुमारे २७ लाख ६० हजारहून अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांवर जाऊन अंगठ्याचा ठसा देवून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. ई-केवायसी न केलेल्या रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता असून तीस टक्के पिवळ्या शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी करणे अद्याप बाकी आहे.

नवी मुंबई युवा सेना जिल्हाध्यक्ष पदी अनिकेत म्हात्रे यांची नियुक्ती

युवा सेनेच्या नवी मुंबई युवा जिल्हाध्यक्ष पदी अनिकेत म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आलेय. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यातर्फे अनिकेत म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आलेय. अनिकेत म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. अनिकेत म्हात्रे यांना युवा सेना जिल्हाध्यक्ष पद दिल्याने नवी मुंबईत युवकांची मोठी फळी निर्माण करण्यास मदत होणार असून आगामी मनपा निवडणुकीत याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

वाघबीळ इथं दगडफेक कॉलेजमधील वादातूनच; 18 जणांवर गुन्हा

पन्हाळा मार्गावरील वाघबीळ घाटातील चौकात सोमवारी सायंकाळी तरुणांनी एकमेकांवर दगडफेक करत दुकानांसमोर लावलेल्या वाहनांची तोडफोड केली होती. कॉलेजमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून झालेल्या वादाच्या रागातून ही दगडफेक झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 18 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अमरावतीच्या जुन्या बायपासवरील अनधिकृत वीटभट्ट्यांवर कारवाई..

अमरावती शहरातील जुना बायपास रोडवर असलेल्या निंभोरा वस्तीगृहानजिक अनधिकृत व अतिक्रमण असलेल्या चार विटभट्टी व काही अनधिकृत बांधकामावर अमरावती महसूल विभागाने कारवाई केली आहे,जेसीबी लावून या ठिकाणी वीटभट्ट्या उध्वस्त करून या ठिकाणी जागा पूर्णपणे सफाई करण्याचं काम चालू आहे... तसेच याच ठिकाणी काही बेकायदेशीररित्या बांधकाम करून ठेवलं होतं,ते देखील काम तोडण्याची कारवाई सुरू आहे,

उल्हासनगरमध्ये झेप्टोच्या गोदामात मुदत संपलेल्या चपात्या आणि मशरूम

झेप्टोच्या डिलिव्हरी मध्ये निकृष्ट किंवा मुदत संपलेला माल येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष संजय घुगे यांनी कार्यकर्त्यांसह उल्हासनगरच्या जवाहर टॉकीज परिसरातील असलेल्या झेप्टोच्या गोदामाला भेट देत पाहणी केली. यावेळी तिथे मुदत संपलेल्या रेडी टू इट चपात्या आणि मशरूमचे पॅकेट आढळून आले. तर दुसरीकडे स्विगीच्या गोदामात व्हेज आणि नॉनव्हेज फ्रोजन पदार्थ एकाच फ्रीजरमध्ये ठेवले जात असल्याचं समोर आलं. या दोन्ही प्रकारांची प्रकारांबाबत मनसेने तिथल्या व्यवस्थापनाला जाब विचारत यात सुधारणा करण्याची मागणी केली. या प्रकारांमुळे झेप्टोकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष संजय घुगे यांनी केला आहे.

जालन्यात मोसंबीचे दर 6 ते 7 हजार रुपयांनी घसरले; मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत

मोसंबीचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात मोसंबीचे दर हे सहा ते सात हजार रुपयांनी घसरल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. पंधरा दिवसांपूर्वी जालन्याच्या मोसंबीला 22 ते 25 हजार रुपये प्रति टन असा भाव मिळत होता मात्र उत्तर भारतामध्ये आंध्र प्रदेश येथील मोसंबीची मागणी वाढली आहे त्यामुळं जालन्याच्या मोसंबीची मागणी कमी झाल्याने मोसंबीच्या दरात मोठी घसरण झाली आहे स.ध्या जालनाच्या मोसंबीला 14 हजार रुपये ते 18 हजार रुपये प्रति टन भाव मिळत आहे त्यामुळे एकीकडे पाण्याअभावी मोसंबीच्या बागा वाचवण्याच मोठ संकट शेतकऱ्यांच समोर आहे l तर दुसरीकडे मोसंबीच्या भावामध्ये झालेली घसरणीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे...

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग, तेरा पुजाऱ्यांची नावे समोर

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याची ही नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे.विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजा यांनी पोलिसांनाकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे.तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे आल्याने सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा,तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे,ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे म्हणाले.दरम्यान तीन वर्षापासून तुळजापूर इथे सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करी विरोधात पुजारी मंडळाने पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा देखील विपीन शिंदे यांनी केलाय .

महाड MIDC मध्ये पिण्याच्या पाण्यावरून वाद; एकावर जीवघेणा हल्‍ला

महाड MIDC मध्ये पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या वादात एकावर लोखंडी रॉडने जिव घेणा हल्ला झाला आहे. या प्रकरणी महाड MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमीला MGM रुग्णालयात उपचारा करता दाखल करण्यात आले आहे. संभाजी दिगंबर मोरे असे जखमीचे नाव आहे. सोसायटीत पाणी पुरवठा करण्‍यासाठी असलेल्‍या जुन्‍या मीटर वरून हा वाद निर्माण झाला आणि या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. याप्रकरणी चंद्रकांत कुराडे याच्‍याविरोधात महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. हाणामारीची ही घटना महाड तालुक्‍यातील नांगलवाडी येथील शुभलाभ सोसायटी येथे घडली.

Pune : शहरातील पावसाळापूर्व कामांचे नियोजन करा

पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेतील प्रत्येक विभागाने आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण करावीत, अशा सूचना या बैठकीत विभागप्रमुखांना करण्यात आल्या. विभागाच्या वतीने सुरू असलेली कामे दिलेल्या वेळेत पूर्ण होत आहेत, की नाही, याचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यात कोणत्याही भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी नालेसफाई व ड्रेनेज सफाईसाठी प्रत्येकी एकेक, अशा ३० निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही कामे केली जातील

Pune : दीनानाथ मंगेशकर प्रकरण धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर

गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तालयाने काल राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर केला

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कडून नियमांची उल्लंघन झाले आहे का? याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशा नुसार ही चौकशी करण्यात आली आहे.

राज्याचा आरोग्य विभाग महापालिकेची माता मृत्यू अन्वेषण समिती धर्मादाय आयुक्तालय अशा तीन पातळीवर चौकशी करण्यात येत आहे.

आतापर्यंत आरोग्य विभागाने धर्मादाय आयुक्तालयाने राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केला आहे

आरोग्य विभागाच्या अहवालात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वर ठपका ठेवण्यात आला होता त्यामुळे आता धर्मादाय आयुक्तलयाने काय अहवाल दिला हे पाहावे लागेल.

त्यामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वर कारवाई करण्याचा निर्णय शासन स्तरावर होणार आहे.

Maharashtra News Live Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचं आज पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे.त्याचे क्रॉंक्रीटीकरण करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा होऊनही या रस्त्याचे काम सुरु झाले नाही.

गेल्या दोन वर्षापासून सातत्याने मागणी करून ही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. या अनास्थेला कंटाळून अखेर खासदार सुप्रियाताई सुळे या आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलनास बसणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

Sabudana Thalipeeth Recipe : आषाढी एकादशीसाठी झटपट गरमा गरम साबुदाणा थालीपीठ रेसिपी

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT