Dhanshri Shintre
भारतीय रेल्वे दररोज तब्बल १३ हजारपेक्षा अधिक गाड्यांचे संचालन करते, जे जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक आहे.
भारतातील रेल्वे प्रणालीला देशाची जीवनवाहिनी मानले जाते, कारण ती कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन प्रवासाचा आधार आहे.
कदाचित तुम्ही पाहिलं असेल की काही रेल्वे डबे खूप जुने आणि पारंपरिक शैलीत तयार केलेले असतात.
जुन्या रेल्वे डब्यांसोबत रेल्वे काय करतं, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्या उपयोगाबद्दल.
सर्वप्रथम, रेल्वे जुने डबे काढून टाकून त्यांची जागा नवीन आणि सुधारित डब्यांनी भरत आहे.
रेल्वे आता पारंपरिक आयसीएफ कोचऐवजी अधिक सुरक्षित आणि आरामदायक एलएचबी कोचचा वापर करत आहे.
रेल्वे अनेकदा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जुने डबे वापरून तात्पुरती निवास व्यवस्था तयार करते.
कोरोना काळात, रेल्वेने रुग्णांसाठी विशेष आयसोलेशन कोच तयार करून आरोग्य सेवा पुरवली होती.