GK: भगवान जगन्नाथ रथयात्रेतील दोऱ्यांमागील रहस्यमय आणि रंजक कथा? वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

जगन्नाथ रथयात्रा

दरवर्षी ओडिशातील पुरीत हजारो भक्त मोठ्या श्रद्धेने येऊन जगन्नाथ रथयात्रेत रथ ओढण्याचा मान मिळवतात.

काही रोचक गोष्टी

आज आपण जगन्नाथ रथयात्रेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या खास दोऱ्यांबद्दल काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या फारच कमी लोकांना माहित आहेत.

शंखचूड

भगवान जगन्नाथांच्या रथाला ओढण्यासाठी ‘शंखचूड’ नावाची दोरी वापरतात. शंखचूड नावाच्या राक्षसाने पूर्वी देवाची मूर्ती चोरून भक्तांचा विश्वास तोडण्याचा प्रयत्न केला होता.

शंखचूडाचा वध

हे कळताच बलभद्र रागावले आणि शंखचूडाचा वध केला. नंतर शंखचूड देवाची सेवा करण्यास इच्छुक झाला.

दोरी कशी तयार झाली?

शंखचूडाच्या नसा व मणक्यांपासून तयार झालेली दोरी आज भगवान जगन्नाथांच्या रथाला ओढण्यासाठी ‘शंखचूड’ म्हणून ओळखली जाते.

वासुकी दोरी

बलभद्रच्या रथाला ओढण्यासाठी ‘वासुकी’ नावाची दोरी वापरतात. मान्यता आहे की वासुकीला आपल्या धाकट्या भावाप्रमाणे सेवा करण्याची इच्छा होती.

शेष नाग काय म्हणले?

शेष नागांनी सांगितले, जेव्हा मी नारायणाचा मोठा भाऊ म्हणून जन्म घेईन, तेव्हा तू माझी सेवा करशील आणि बलभद्रच्या रथाची दोरी वासुकी होशील.

सुभद्रा देवीचे रथ

सुभद्रा देवीच्या रथाला ओढण्यासाठी ‘स्वर्णचुड’ नावाची दोरी वापरतात, जी मानवी नाती, कर्म आणि आसक्तीचे प्रतीक मानली जाते.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. साम टीव्ही याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: जगन्नाथ पुरीचे ५ स्वादिष्ट स्ट्रीट फूड, एकदा तरी नक्की भेट द्या

येथे क्लिक करा