Sakshi Sunil Jadhav
आषाढी एकादशी निमित्त साबुदाण्याची खिचडी न करता झटपट खरपूस थालीपीठ नक्की तयार करा.
१ वाटी साबुदाणे, ४ मध्यम उकडलेले बटाटे, भाजलेले शेंगदाणे, मीठ, तूप इ.
साबुदाणे कढईत व्यवस्थित भाजून घ्या.
भाजलेले साबुदाणे दरदरीत मिक्सरमध्ये बारिक करा.
शेंगदाणे मिरची मिक्सरच्या भांड्यात बारिक करा.
बटाटे किसून पिठात मिक्स करा. त्यात शेंगदाण्याची पावडर मिक्स करून मळून घ्या.
पाण्याचा वापर करून साबुदाण्याचं पीठ एकदम सॉफ्ट मळून घ्या.
तयार पीठ १० मिनिटे झाकून ठेवा. मग पोलुपाटावर एक प्लास्टिक पेपर ठेवून तूप लावून घ्या.
आता पीठ ठेवून एक सारखे लाटून घ्या. नॉनस्टिकच्या तव्यावर खरपूस भाजून थालीपीठ सर्व्ह करा.