Shruti Vilas Kadam
नीना गुप्ता यांनी विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतच्या नात्यातून मसाबा गुप्ताला जन्म दिला. या निर्णयामुळे त्यांच्यावर समाजाकडून मोठ्या प्रमाणावर टीका झाली.
८०-९० च्या दशकात अशा प्रकारचा निर्णय घेणं हे फार धाडसी मानलं जायचं. पण नीना गुप्ता यांनी समाजाच्या भीतीपोटी न झुकता आपला निर्णय ठामपणे स्वीकारला.
व्यक्तिगत आयुष्यामुळे त्यांना अनेक भूमिका गमवाव्या लागल्या आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत फारसं स्वीकारलं गेलं नाही.
नीना गुप्ता यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि अभिनय कौशल्यावर इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपलं स्थान निर्माण केलं.
२०१८ साली आलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेने त्यांना प्रचंड प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळवून दिली.
मसाबा गुप्ता आज प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. आई आणि मुलीचं नातं नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे.
त्यांची संघर्षमय कथा अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे – विशेषतः त्या स्त्रियांसाठी ज्या समाजाच्या चौकटीबाहेर निर्णय घेतात.