Winter Forecast 
महाराष्ट्र

Maharashtra Weather: राज्यात गुलाबी थंडीची चाहूल; ऐन दिवाळीत पहाटेचा गारवा वाढला, पण दिवसा तापमानात वाढ, IMD चा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्यात ऐन दिवाळीत गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेच्या तापमानात घट होत असून निफाडमध्ये नीचांकी १२.७ अंशांची नोंद झाली. दुसरीकडे रत्नागिरीत कमाल तापमान ३७.६ अंशांवर पोहोचले आहे.

Namdeo Kumbhar

IMD Maharashtra Weather Forecast Today : राज्यात आता हळूहळू हिवाळ्याची चाहूल लागली असून, पहाटेच्या वेळी हवेत छान गारवा जाणवू लागला आहे. मात्र, दिवस जसजसा वर येतो, तसतसा उन्हाचा चटका आणि उकाडा देखील जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या राज्यातील तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. पुढील काही दिवसात राज्यात कडाक्याची थंडी पडू शकते.

कमाल तापमानात वाढ:

आज राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पण राज्यामध्ये अनेक भागांत दिवसाचे कमाल तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय सांताक्रूझ, अमरावती, डहाणू, सोलापूर, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा या भागांतही तापमान ३५ ते ३६ अंशांच्या पुढे गेले असून उन्हाचा जोर कायम आहे.

किमान तापमानात घट आणि गारवा:

यातच राज्याच्या किमान तापमानात घट होत असली तरी अद्यापही गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे. सध्या रात्रीच्या आणि पहाटेच्या किमान तापमानात घट होत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे पहाटेच्या वेळी आणि सकाळी हवेत हुळहुळी थंडी आणि छान गारवा अनुभवता येत आहे.

हवामानातील बदलाचे कारण:

पुढील काही दिवस राज्यात तापमानाचा लपंडाव कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्यामुळे हवामानात हे बदल होत आहेत. आज (ता. ८) देखील राज्यात असाच तापमानाचा लपंडाव आणि चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नरक चतुर्दशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट

Sunday Horoscope : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या ४ राशींचं भाग्य उजळणार! माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार धनलाभ

Sunday Horoscope: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या राशींचे नशीब चमकणार! कोणाला मिळणार धनलाभ, कोणाच्या आयुष्यात येणार आनंद?

Blood Pressure : घरी बीपी मोजता? हाताची ही एक चूक देऊ शकते चुकीचे रीडिंग

लक्ष्मीपूजनासाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि वस्तूंची यादी

SCROLL FOR NEXT