Maharashtra Rainfall Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: परतीच्या पावसाचा हाहाकार! आज पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Weather Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस आज झोडपून काढणार आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Priya More

Summary -

  • राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार सुरूच

  • कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पाऊस

  • सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट

  • पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस

परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालं. नवरात्रीमध्ये देखील पावसाने झोडपून काढलं. आता दिवाळी तोंडावर आली तरी देखील पाऊस जायचे नाव घेत नाही त्यामुळे बळीराजा सध्या संकटात आहे. आजही राज्याला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.

आज राज्यात तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरीत राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा पाऊस पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT