Maharashtra Monssoon Update Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Update: अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा मान्सूनला फटका; पावसाचे आगमन पुन्हा लांबणीवर!

Maharashtra Monsoon Update: मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. यंदाचा मान्सून लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Monsoon Update: मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. यंदाचा मान्सून लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण, गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्‍यावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे.

त्यामुळे अद्याप मान्सून केरळातच दाखल झालेला नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. (Latest Marathi News)

मात्र, अचानक तयार झालेल्या चक्रीवादळामुळे केरळमध्ये अद्यापही मान्सूनसाठी अनुकूल वातावरण नसून, आगमनासाठी आणखी चार ते पाच दिवस लागतील, असा अंदाज हवामान खात्याने (Rain Update) आता व्यक्त केला आहे. दुसरीकडे वळीवाच्या पावसाने मात्र राज्यातील बहुतेक भागात हजेरी लावली आहे.

साधारणपणे दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होते. मात्र, यंदा मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू आहे. याआधी केरळमध्ये ४ जूनला मान्सून दाखल होईल, त्यानंतर महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

मात्र, आता मान्सून केरळमध्ये (Monsoon Update) चार ते पाच दिवस उशीरा दाखल होणार असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये ७ ते ८ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात साधारणपणे १३ ते १५ जून दरम्यान पाऊस सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मेघगर्जनेसहित विजांचा कडकडाट पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच ७ आणि ८ जूनला विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमान वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. पुणे आणि आसपासच्या भागातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वारा वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT