Maharashtra Today Weather Update News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात उकाडा वाढला, पण या ९ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: राज्यात उकाडा वाढला असताना मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा, सोलापूर, बीड, लातूर, नांदेडसह ९ जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra weather forecast today district wise : राज्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा वातावरणात हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उर्वरित राज्यात उघडीप राहून ढगाळ हवामान आणि ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. (thunderstorm alert for Central Maharashtra and Marathwada)

या जिल्ह्यांना पावसाचा इशारा:

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत, तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस होऊ शकतो. इतर बहुतांश भागांत मात्र पावसाची उघडीप कायम राहून उकाडा जाणवेल.

तापमानातील चढ-उतार:

मागील २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वर येथे नीचांकी १७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पावसाची उघडीप असल्याने कमाल तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तसेच २४ तासांत रायगडमधील श्रीवर्धन येथे सर्वाधिक ५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र:

सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. सौराष्ट्र आणि अरबी समुद्रात तसेच उत्तर थायलंड परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालींमुळे उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, ते ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे येताना आणखी तीव्र होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ; जैवविविधतेसह प्राचीन मंदिरांना धोका

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे; फडणवीस सरकारला ९० दिवसांचा 'अल्टीमेटम'

खासगी रुग्णालयांमधील लुटीचा पर्दाफाश; 11 रुपयांची सलाईन थेट 325 रुपयांना

कॅन्सरच्या नकली औषधांची विक्री; बेंगळुरूसह महाराष्ट्र, तमिळनाडूतही नेटवर्क

Horoscope Thursday : 6 राशींची चांदी होणार, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा गुरुवारचे राशीभविष्यओ

SCROLL FOR NEXT