Maharashtra Weather Update Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट; पुढील ४ दिवस विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये गारपीटीची शक्यता

Unseasonal Rain Alert In Vidarbha: पुढील चार दिवस विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह कोकण विभागात उष्णतेची लाट जाणवत आहे.

Rohini Gudaghe

मुंबईसह कोकणामध्ये सध्या उष्णतेची लाट जाणवत आहे. पुढील चार दिवस विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात (Maharashtra Weather Update) आली आहे. राज्यामध्ये एकीकडे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे विदर्भामध्ये वादळी पावसाने हजेरी लावल्याचं दिसत आहे.

आज विदर्भाला गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे आहे. अमरावती आणि वर्धामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. उर्वरित राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस (Weather Update) झाला आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत ईशान्य अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात वादळी पावसाला पोषक असं हवामान तयार होत आहे.

वाशीम, नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस (Unseasonal Rain Alert In Vidarbha) आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. अकोला, मालेगाव, वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ४३ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान होतं.

कोकणामध्ये तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईसह कोकण विभागात उष्णतेची लाट जाणवत आहे. ही लाट आणखी पुढील चार दिवस राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणात तापमानात (Vidarbha Hail Stormy) किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यामध्ये आता पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाड्यात 12 मेपर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

SCROLL FOR NEXT