MAHARASHTRA WEATHER UPDATE: PRE-MONSOON RAIN ALERT, THUNDERSTORMS LIKELY AS MONSOON NEARS KERALA Saam Tv
महाराष्ट्र

Weather Update : पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून, महाराष्ट्रात वादळी पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व वादळी पावसाची शक्यता असून अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात पुढील काही दिवस मान्सूनपूर्व वादळी पाऊस

  • नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

  • पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार

  • उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार

Maharashtra Today Weather Update News महाराष्ट्रात उकाडा काहीसा कमी झाला असून पुढील काही दिवस जोरदार वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह राज्यभरात मान्सूनपूर्व वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. दरम्यान मान्सून केरळच्या उंबरठ्यावर असून पुढील २ दिवसांत त्याचं आगमन होणार आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडाच्या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि तुरळक गारपिटीची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान आता शेतकरी राजा मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे.

हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक (Nashik Rain Alert) तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar Rain Alert) जिल्ह्यासाठी वादळी पाऊस आणि तुरळक गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट (Maharashtra Rain Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील इतर अनेक भागांतही मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची तीव्रता कमी झाली असली, तरी वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे उकाड्याचा त्रास कायम आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका जाणवत असून, काही भागांत ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार होत आहेत. देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या मान्सूनच्या केरळमधील (Kerala Monsoon Update) आगमनाचा यंदाचा मुहूर्त काहीसा लांबला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात ढग दाटून आले असून मान्सून केरळच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून केरळ तसेच तमिळनाडूच्या दक्षिणेकडील काही भागांत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा मान्सूनने अंदमान-निकोबार बेटांमध्ये १६ मे रोजी वेळेआधीच हजेरी लावून दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे केरळमध्येही तो नेहमीपेक्षा लवकर, म्हणजे २६ मेच्या आसपास दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र वातावरणातील बदलांमुळे त्याच्या पुढील वाटचालीला काहीसा उशीर झाला आहे. सोमवारी मान्सूनची प्रगती स्थिर राहिली. तथापि, हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार पुढील ४८ तासांत केरळ, तमिळनाडूचा दक्षिण भाग, लक्षद्वीप परिसर, अरबी समुद्राचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही क्षेत्रांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update: 'लाडकी बहीण' योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, अपात्र महिलांवर घेतला मोठा निर्णय, वाचा अपडेट

Mahabaleshwar Tourism: पावसाळ्यात पिकनिकला जाण्याचा प्लान करताय? महाबळेश्वरजवळच्या Top 7 ठिकाणी नक्कीच द्या भेट

Ladki Bahin Yojana : राज्यावर आर्थिक संकट, ८० लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळली, नेमकं सत्य काय?

Handvo Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी गुजराती हांडवो, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: कांद्याला हमीभावासाठी मंचरमध्ये आज शेतकरी पुणे नाशिक महामार्ग रोखणार

SCROLL FOR NEXT