Maharashtra Today Weather News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : सूर्य आग ओकतोय! मुंबईसह अनेक जिल्ह्यांत उकाडा वाढला; आज कुठे कसं हवामान? वाचा

Maharashtra Today Weather News : राज्यात तापमानात झपाट्याने वाढ होत असून मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा त्रास वाढला आहे. काही भागात विजांसह पावसाची शक्यता असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात तापमानात वाढ होऊन उकाडा वाढला आहे

  • कोकणात उष्ण व दमट हवामान

  • काही जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता

  • नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन

Maharashtra Today 10th April Weather Temprature राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत आहे तर दुरीकडे, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. मुंबईत हळूहळू उकाडा वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तसेच आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढणार आहे.

राज्यातील अवकाळी पावसाने उघडीप देताच राज्याच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. दिवसभर वेळी उकाडा आणि संध्याकाळ नंतर काहीसा गारठा असे चित्र कायम आहे. काल म्हणजेच गुरूवारी वाशीम आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे येथे राज्यातील नीचांकी १७.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला पोषक हवामान आहे.

उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे.सतत बदलत जाणाऱ्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस वाढणारा उकाडा तापदायक ठरत असून नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असे तज्ज्ञांचे आवाहन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM फडणवीसांचा वंदे भारत ट्रेनने प्रवास; मुंबईवरून शिर्डीला पोहोचल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

Eye Care Tips: डोळे चोळण्यापासून ते अपुरी झोपेपर्यंत, तुमच्या या ८ सवयींमुळे होतंय डोळ्यांचं मोठं नुकसान

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये रक्षक चौकच्या नव्या उड्डाण पुलाच्या उद्घाटनापूर्वीच अपघात

लाखो लिटर इंधन गेलं कुठं? शेतकऱ्यांचा प्रश्न;पालकमंत्र्यांची थेट पेट्रोल पंपावर धाड, मालक फरार

Bhimashankar Temple : भिमाशंकर मंदिराची कवाडं १ जूनला उघडणार? दर्शनासाठी का होत मंदिर बंद?

SCROLL FOR NEXT