Maharashtra weather saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, किनारपट्टी भागात IMDकडून तीव्र अलर्ट

Maharashtra Weather Update: पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.

Bharat Jadhav

Maharashtra weather update: कोकणपट्ट्यात आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. मराठवाड्यातही पावसाला पोषक स्थिती आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची उघडीप आहे. हवामान खात्याने आज रायगड रत्नागिरीसह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिलाय. या भागात मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याची ही शक्यता आहे .

मुंबई ,ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथ्यावर तसेच तळ कोकणात सिंधुदुर्ग सातारा व कोल्हापूर माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे .या भागांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यात आज परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. विदर्भात अमरावती, नागपूर ,भंडारा, चंद्रपूर, आणि गडचिरोली तसेच नंदुरबारमध्येही पावसाचा अलर्ट आहे . पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

पावसाला पोषक स्थिती

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार तासात बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनी पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे.

तळ कोकणापासून ते मुंबई, पालघर पर्यंतच्या किनारपट्टी असणाऱ्या भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे .सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागात पुढील तीनही दिवस पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले असून सोमवारी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक घाट परिसरात पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहे. पुढील दोन दिवसात विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार आहे. कल्याण, डोंबिवली आणि पालघर भागात मेघगर्जनेसह ढगांची संख्या 4.5 किमीपर्यंत आहे. भारतीय हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजावर लक्ष ठेवा.  असा इशारा हवामान विभागानं दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पत्नीच्या हत्ये प्रकरणातील कैद्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातील घटना

Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

Pune Tourism : मित्रांची साथ अन् बाईक राइड, वीकेंडला पाहा पुण्यातील 'हा' मनमोहक धबधबा

Maharashtra Politics : सोन्याचा चमचा अन् भरलेलं ताट, विधान परिषदेत एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली

Aadhaar Update: घरी बसून आधार कार्ड अपडेट करता येईल का? फोटो बदलण्याचे नियम समजून घ्या

SCROLL FOR NEXT