Bhushi Dam : भुशी धरण ओव्हरफ्लो; धरणावर वर्षा विहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी

Maval News : गेले दोन दिवस झाले पावसाने समाधानकारक उघडीप घेतल्यामुळे आज लोणावळा शहरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यावर बसून भिजण्याचा मनसोक्त आनंद घेता आला
Bhushi Dam
Bhushi DamSaam tv
Published On

मावळ : मागील तीन- चार दिवस झाले मावळ, लोणावळा परिसरात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे. सलग दोन दिवस सुटी आणि पावसाची उघडीप मिळाल्याने पर्यटनासाठी येण्याची चांगली संधी मिळाली होती. परिणामी आज वर्षा विहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली. 

राज्यात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. काही भागात तर सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. यामुळे अनेक भागात नद्यांना पूर आले आहेत. दरम्यान लोणावळा परिसरात असलेल्या भुशी धरण परिसरात देखील जोरदार पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तर गेले दोन दिवस झाले पावसाने समाधानकारक उघडीप घेतल्यामुळे आज लोणावळा शहरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यावर बसून भिजण्याचा मनसोक्त आनंद घेता आला. 

Bhushi Dam
Pune News : ८५ वर्षीय आजोबांना विवाहाची इच्छा; जाहिरात पाहून महिलेशी संपर्क, पण वरमाला पडण्यापूर्वीच झाली गफलत

पर्यटकांचा मनसोक्त आनंद 

तासंतास पर्यटक धरणाच्या पायऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्यामध्ये बसून भिजण्याचा व वर्षभराचा आनंद घेत आहे. कुटुंबासह लोणावळा शहरांमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांना आजचा दिवस पर्वणीच ठरला आहे. पालखी बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात असल्यामुळे त्याचा परिणाम लोणावळा पर्यटकांच्या बंदोबस्तावर देखील जाणवला.

Bhushi Dam
Amravati Crime : कॅफेच्या आड अश्लील चाळे; २०० रुपयात मिळतोय एक तास, दामिनी पथकाच्या कारवाईत १३ जण ताब्यात

तापी नदी पात्रात वाढ 

नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील तापी नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पाण्यात वाढ झाल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आली असून तापी नदी क्षेत्रात पाण्याची वाढ झाल्याने २३ गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. तर पाण्यात वाढ झाल्याने प्रकाशा बॅरेजचे दोन दरवाजे २.५ मीटरने उघडले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com