Maharashtra Weather Alert Saam Tv News
महाराष्ट्र

Weather Update : राज्यात पुढील ४ ते ५ दिवसात मिश्र स्वरुपाच्या हवामानाचा अंदाज , विदर्भाला गारपीटीचा इशारा; तर मराठवाड्यात...

Maharashtra Weather Alert : भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील ४,५ दिवसांत मिश्र प्रकारचे तीव्र हवामानची शक्यता आहे. विदर्भात २७ आणि २८ एप्रिलला गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Prashant Patil

मुंबई : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसात मिश्र स्वरुपाच्या तीव्र हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाच्यावतीने चार ते पाच दिवसांसाठीचा अंदाज जारी करण्यात आला आहे. त्यानुसार या कालावधीत मिश्र प्रकारचं तीव्र हवामान राहण्याची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी देखील सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील ४,५ दिवसांत मिश्र प्रकारचे तीव्र हवामानची शक्यता आहे. विदर्भात २७ आणि २८ एप्रिलला गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, २५ एप्रिलला अकोला आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय गडगडाटासह पाऊस होण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येत्या चार ते पाच दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्ण दमट परिस्थिती आणि गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय २५ एप्रिलला दक्षिण कोकणात गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना २७ एप्रिलला ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. तर, विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. २८ एप्रिल भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भातील इतर जिल्ह्यांना आणि मराठवाडा अन् दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fennel Seeds Benefits: जेवणानंतर बडीशेप खाता? जाणून घ्या रोज बडीशेप खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Cabinet Meeting: अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10 टक्के आरक्षण; राज्य सरकारनं घेतले १० महत्त्वाचे निर्णय

आजोबा-पणजोबांची जमीन नक्की कुठे अन् किती आहे? एका क्लिकवर शोधा ७/१२ अन् जमिनीचा नकाशा

Maharashtra News Live Update: चाकणमधील कंपनीला भीषण आग

Honeymoon Destinations: डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करताय? ५ ड्रीम डेस्टिनेशन्स समोर परदेशही वाटेल फिका

SCROLL FOR NEXT