Maharashtra Weather Update: 
महाराष्ट्र

Weather Update: मुंबईसह उपनगरात परतीच्या पावसाची हजेरी; वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने वाढवली बळीराजाची चिंता

Maharashtra Weather Update: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.

Bharat Jadhav

राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली. ऑक्टोबर हिटने हैराण झालेल्या नागरिकांना परतीच्या पावसाने काही दिलासा दिला. तर वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं असून राज्यातील काही भागात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार,आजपासून पुढील ४ दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह परतीचा पावसाची हजेरी लावली. ठाणे शहरात ढगाळ वातावरण असतानाच संध्याकाळचा सुमारास शहरात पूर्णपणे अंधार पसरला. पावसाचा जोर कमी होता मात्र विजेचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातील

शहापूर तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार परतीचा पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसाने कापणीला आलेल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परतीच्या पावसामुळे शेतात आलेला भात पडला तर नुकसान होऊ शकते या भिती शेतकरी चिंतेत सापडला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पुन्हा एकदा अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहू लागलाय. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. मुसळधार झालेल्या पावसामुळे मका, बाजरी कापूस या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने जमिनीवर कापून ठेवलेले सोयाबीन, मका आणि वेचणीला आलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. अनेक शेतीमध्ये पाणी थांबले आहे. तोंडी आलेला घास पावसाने हिरवला जाण्याने शेतकरी चिंतेत सापडलाय.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील अर्धा तासापासून मुंबईसह पश्चिम उपनगरात मानसून चा परतीचा पाऊस सुरू झाला आहे. सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं अशातच आता उपनगरातील अंधेरी गोरेगाव जोगेश्वरी मालाड कांदिवली परिसरात मान्सून परतीचा पाऊस सुरू झाला आहे परिणामी ऑक्टोबर हिट मुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील अर्धा तासापासून पश्चिम उपनगरातील अनेक भागात ढगांच्या गडगटाटासह रिप रिप पाऊस सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसोबत आज मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील; वाचा राशीभविष्य

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

SCROLL FOR NEXT