Maharashtra Today Weather Update News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : मान्सूनचा प्रवास रखडला, पण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Monsoon Update : मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी त्याची पुढील वाटचाल मंदावली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Rain and wind alert Maharashtra weather update : मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला, पण त्यानंतर त्याचा प्रवास रखडला आहे. मान्सून अरबी समुद्रातून अद्याप पुढे सरकलेला नाही. १५ जूननंतर मान्सून महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज वर्तवला जात आहे. २ दिवसांपासून मान्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल जैसे थेच आहे. मान्सूनचा प्रवास रखडला असता तरी राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणात आणि साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो.

कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, दोडामार्ग, कणकवली आणि रत्नागिरीतील राजापूर येथे रविवारी मुसळधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही पावसाने धुमाकूळ गातला होता. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पवसाने हजेरी लावल्याचे हवामान विभागाने सांगितलेय. आजही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत आज जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. पालघर जिल्ह्यात उष्णतेची लाट असून, उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक राहू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : कोल्हापूर, सांगली, रायगड, अहिल्यानगर, पुणे, सातारा घाटमाथा,सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती,लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशीम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली.

उष्ण लाट व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर.

उन्हाचा चटका कायम असलेली ठिकाणे : अकोला ४३.३, ब्रह्मपुरी ४३.२, वर्धा ४३, चंद्रपूर ४२.४, मालेगाव ४२, गडचिरोली ४२.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

SCROLL FOR NEXT